मुंबईत १६४ शाळा बेकायदेशीर; पालकांच्या आक्रोशाच्या बातम्या; प्रत्यक्षात १५२ ठिकाणी शाळांच्या नावाखाली मदरसे आणि मशिदींचे बांधकाम!!

Mumbai are illegal

नाशिक : मुंबई महापालिकेने कालच एक दोन नव्हे, तर १६४ शाळा बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. त्या शाळांची यादी जाहीर केली. त्याबरोबर शिक्षणाचा कळवळा दाखवून काही मराठी माध्यमांनी आता या शाळेमधील मुले शिकणार कुठे??, त्यांच्या बालकांनी करायचे काय??, अशा आक्रोश करणाऱ्या बातम्या दिल्या. मुंबई महापालिकेने जणू काही मुलांचा शिक्षणाचा हक्कच काढून घेतल्याचा कांगावा मराठी माध्यमांनी या बातम्यांमधून केला.Mumbai are illegal; News of parents’ outcry; In reality, madrasas and mosques are being constructed in the name of schools at 152 places!

– बेकायदा मदरसे आणि मशिदी

पण प्रत्यक्षात मुंबईतल्या ज्या १६४ शाळा मुंबई महापालिकेने बेकायदेशीर म्हणून जाहीर केल्या, त्यापैकी १५२ शाळा मुस्लिम बहुल इलाख्यातल्या निघाल्या. यापैकी बहुतांश शाळा कुठलीही परवानगी नसताना उघडल्या होत्या. बहुतांश ठिकाणी शाळांच्या नावाखाली तिथे मदरसे उभारले गेले. अनेक ठिकाणी शाळांच्या नावाखाली बेकायदेशीर मशिदी बांधल्या, हे धक्कादायक वास्तव आता उघडकीला आले. यातल्या बहुतांशी शाळा गोवंडी, मानखुर्द, मालाड, मालवणी, कांदिवली या भागातल्या निघाल्या. शाळांच्या नावाखाली इथे मदरसे आणि मशिदीच्या बांधकामाचा धंदा चालू होता. यातले बहुसंख्य मदरसे आणि मशिदींचे बांधकाम सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून केल्याचे आढळून आले. मुस्लिम बहुल विभागातला कुठला ना कुठला तरी भू माफियाच शाळांच्या नावाखाली मदरसे आणि मशिदी चालवताना आढळून आला.



भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी त्यातल्या 12 प्रत्यक्षात ठिकाणी भेट देऊन तिथले धक्कादायक वास्तव समोर आणले. वर उल्लेख केलेले एकाही शाळेच्या संचालकांनी सरकारी परवानगी घेतली नाही किंबहुना सरकारी परवानगी घेण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. त्यांनी परस्परच सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून बहुमजली मदरसे बांधले. अनेक ठिकाणी शाळांचे आणि मदरशांचे रूपांतर मशिदींमध्ये केले, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर मुंबईच्या महापालिका आयुक्त आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन बेकायदेशीर शाळांवर, मदरशांवर आणि मशिदींवर कठोर कायदेशीर कारवाई करायची मागणी केली. पुढच्या आठवड्यापासून ही कारवाई सुरू होऊ शकेल, अशी माहिती त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

– मराठी माध्यमांची चालूगिरी

किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीचे गांभीर्य असे की, मुस्लिम बहुल विभागातल्या भू माफियांनी बिनदिक्कतपणे सरकारी जमिनींवर अतिक्रमण केले. तिथे शाळांच्या नावाखाली बेकायदा मदरसे आणि मशिदींचे बांधकाम केले. महापालिका किंवा कुठल्या सरकारी यंत्रणांनी त्यावर कारवाई करू नये म्हणून सगळ्या गोष्टींना शाळा बांधकामाचा मुलामा दिला. पण मुंबई महापालिकेने १६४ शाळा बेकायदेशीर ठरविल्यानंतर त्याची बातमी देताना मराठी माध्यमांनी victim card खेळले. शाळा बेकायदेशीर ठरविल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होईल, त्यांच्या पालकांना भूर्दंड सोसावा लागेल, असे चित्र रंगविले. पण कुठल्याही मराठी माध्यमाने बेकायदा मदरसे आणि मशिदींच्या बांधकामाच्या बातम्या दिल्या नाहीत. तिथे जाऊन शोध पत्रकारिता केली नाही.

Mumbai are illegal; News of parents’ outcry; In reality, madrasas and mosques are being constructed in the name of schools at 152 places!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात