विशेष प्रतिनिधी
पुणे : Maharashtra Govt राज्य सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करत त्यावरील भरती प्रक्रियेला फुलस्टॉप दिला आहे. राज्यातील बेरोजगारीचा आकडा झपाट्याने वाढत असताना सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सरकारने तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.Maharashtra Govt
सरकार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर पदाची भरती करते. पण आता सरकारने हे पद मृत घोषित करून त्यावरील भरती प्रक्रिया थांबवली आहे. यामुळे हजारो तरुणांचे स्टेनोग्राफर होण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गात कमालीचा रोष पसरला आहे. एकीकडे सरकार पदभरती करत नाही आणि दुसरीकडे अशा पद्धतीने आहे ती पदे रद्द करण्याचा निर्णय घेते, असा आरोप विद्यार्थ्यांनी या प्रकरणी केला आहे.Maharashtra Govt
विद्यार्थ्यांचा सरकारच्या निर्णयावर संताप
सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करू नये. कारण विद्यार्थी मागील 5 वर्षांपासून या पदाच्या परीक्षेची तयारी करत आहेत. आता सरकारने अचानक हे पद रद्द केल्याने त्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. त्यामुळे सरकारने हे पद मृत घोषित न करता त्यावर भरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सरकारच्या निर्णयामुळे स्टेनोग्राफरचे प्रशिक्षण घेतलेल्या लाखो उमेदवारांचे भविष्य अंधारात बुडण्याची भीती आहे. सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही, तर पुढच्या काळात रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आहे.
ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी स्टेनोग्राफर पदाची तयारी करतात. आता शासनाने ही भरतीच बंद केली, तर त्यांनी जायचे कुठे? विद्यार्थी गत अनेक वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत हरोते. आता लगेच दुसरी फिल्ड निवडताही येत नाही, अशी खंतही काही विद्यार्थ्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली.
रोजगाराच्या संधी हिरावून घेऊ नका – सुप्रिया सुळे
दुसरीकडे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी सरकारचे कान टोचलेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाची भरती थांबविण्यात आली असून हे पद मृत घोषित करण्यात आले आहे. यामुळे क्लासेस लावून ‘स्टेनोग्राफी’ चा कोर्स केलेल्या हजारो तरुणांची निराशा झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्टेनोग्राफर पदासाठी तयारी करतात. ही भरती शासनाने रद्द केल्याने आता नेमकं काय करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
माझी शासनाला विनंती आहे की कृपया या पदासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांची कैफियत शासनाने एकदा ऐकून घ्यावी. हे पद मृत घोषित करण्याऐवजी त्यात काही कौशल्ये जोडून ते सुरू ठेवण्याचा पर्यायही तपासून पहावा. तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App