Nashik : नाशिकमध्ये TCS नंतर पुन्हा धर्मांतर प्रयत्नाचे प्रकरण; इंजिनिअर तरुणीवर लैंगिक अत्याचार; बळजबरीने दारू पाजली

Nashik

वृत्तसंस्था

नाशिक : Nashik नाशिकमध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढतच असल्याचे दिसत आहे. अशोक खरातनंतर टीसीएस कंपनीमधला लव्ह जिहाद प्रकरण, या नंतर आता आणखी एक धर्मांतराचा प्रकार समोर आला असून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तंजीर इनामदारला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.Nashik

या प्रकरणातील पीडित तरुणीने पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी तंजीर इनामदारने तिला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेले. तिथे आपल्याला बळजबरी दारू आणि सिगारेट पिण्यास भाग पाडले. पीडिता शुद्धित नसताना तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.Nashik



गळ्यातील तुळशीमाळ आणि हातातला धागाही तोडला

या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तंजीर इनामदारने पीडित तरुणीने आपल्या गळ्यात घातलेली तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा बळजबरी तोडला होता. तसेच आरोपीने बळजबरीने एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे गजवा-ए-हिंदचे पालन करण्यास सांगून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित तरुणीच्या धार्मिक ओळखीवरच घाला घालण्याचे कारस्थान या आरोपीने केले होते.

गळ्यावर लव्ह बाईट, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

आरोपीने जानेवारी महिन्यात पीडित तरुणीच्या गळ्याजवळ चावा घेत हे लव्ह बाईट असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार विविध ठिकाणी लॉजवर नेत तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.

आणखी काही मुलींचेही लैंगिक शोषण केल्याचा संशय

संशयित आरोपी तंजीर इनामदारने अशाच पद्धतीने शहरातील आणखी काही मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचेही लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या तक्रारीवरून त्याच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात अल असला तरी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. तंजीर इनामदारला कोर्टात हजर करण्यात आले असून पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली आहे.

कोर्टात दोन्ही पक्षाकडील युक्तिवाद

तंजीर इनामदारला कोर्टात हजर करण्यात आले असता यावेळी सरकारी पक्षाने केलेल्या युक्तिवादात म्हटले की, तंजीर इनामदार महागड्या लॉजमध्ये पीडित तरुणीला न्यायचा. दारू सिगारेट पिण्यास भाग पडायचा. धर्मांतर करण्यासाठी पीडित तरुणीला जबरदस्ती करण्यात आली. तसेच हे प्रकरण देखील टीसीएस सारखेच असल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. तसेच महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला? त्याचे आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा शोध घ्यायचा असून त्यासाठी पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली आहे.

तर आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात म्हटले की, दोघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. जानेवारी महिन्यात अत्याचार झाला तर तेव्हापासून आतापर्यंत वेळ का घालवला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच फोटो दाखवून धमकीचा व दारू सिगारेटचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे दोघांचेही एकमेकांवर प्रेम असून घरच्यांनी विरोध केल्याने आता हा आरोप होत असल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे.

Another Forced Conversion Case in Nashik: Engineer Arrested for Rape

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात