Raj Thackeray : राज ठाकरे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत; त्यांना या विषयातले काय कळते? महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ॲड. गुणरत्न सदावर्तेंची टीका

Raj Thackeray

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Raj Thackeray लोकसभा महिला आरक्षण कायद्यातील दुरुस्ती आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारने मांडलेले विधेयक बहुमताअभावी नामंजूर झाले असतानाच, सरकारने रात्रीतून अधिसूचना काढून 2023 चा कायदा लागू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नेमके काय साध्य करायचे होते? असा सवाल करत केंद्र सरकारला धारेवर धरले.Raj Thackeray

मात्र, राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली असून, राज ठाकरेंना या विषयातील नेमके काय कळते, अशी विचारणा करत त्यांची खिल्ली उडवली आहे.Raj Thackeray



ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली असून राज ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, राज ठाकरे यांना अनुसूचित जाती, जमातींचे खासदार वाढू द्यायचे नाहीत. राज ठाकरे हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले आहेत. त्यांना काही समजत नाही, अशी टीका सदवार्ते यांनी केली आहे.

पुढे बोलताना ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, राज ठाकरे यांना एससी, एसटी समाजाचे आमदार, खासदार नको आहेत. राज ठाकरे यांचा हाच वैचारिक डीएनए आहे. राज ठाकरे हे ओबीसींचे विरोधक आहेत. तसेच राज ठाकरे यांचे सर्व उद्योग हे महापालिका, टेंडरशी संबंधित आहेत. परंतु, राज ठाकरे हे संविधानाला चुकीचे दर्शवत आहेत. त्यांचे मनसुबे आम्ही पूर्ण होऊ देणार नाही, असा इशारा सदवार्ते यांनी दिला आहे.

Sadavarte Slams Raj Thackeray Over Women’s Reservation Bill Criticism

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात