MUMBAI Terror Moduel : ATS ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये! मुंबईतून आणखी एक ताब्यात ; प्रयागराजमध्येही हुमेद उर रहमानला अटक


नागपाडा परिसरात महाष्ट्र एटीएसची कारवाई; उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एकजण अटकेत


वृत्तसंस्था

मुंबई : देशात मोठा घातपात घडवून आणण्याचा कट रचला जात असल्याचं समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देशभरातून सहा संशयितांना अटक केली. या कारवाईनंतर महाराष्ट्र एटीएसही अ‍ॅक्शनमोडमध्ये आली असून, नागपाडा परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, प्रयागराजमध्येही एका व्यक्तीला याच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. MUMBAI Terror Module: ATS in ‘Action Mode’! Another in custody from Mumbai; Humed-ur-Rehman also arrested in Prayagraj

घातपात घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करत सहा संशयितांना ताब्यात घेतलं. यात एक मुंबईतील धारावीचा रहिवासी असल्यानं महाराष्ट्र एटीएस सतर्क झाली आहे.



या कारवाईनंतर महाराष्ट्र एटीएसने शनिवारी पहाटे तीन वाजता आणखी एकाला ताब्यात घेतलं आहे. मुंबईतील नागपाडा परिसरातून एटीएसच्या पथकाने या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचं नाव जाकिर असल्याचं सांगण्यात आलं असून, या कारवाईवेळी एटीएसचे अधिकारी हजर होते. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीला कुठे नेण्यात आलं याबद्दलची माहिती कळू शकली नाही.

संशयित हुमेद उर रहमानला प्रयागराजमध्ये अटक

घातपाताच्या कटाची माहिती समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संशयित हुमैद उर रहमानचा शोध घेतला होता. अखेर त्याला शुक्रवारी प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली आहे. प्रयागराजमधील करेली पोलिसांना एटीएस व दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारावरून पोलिसांनी संशयित उर रहमानला अटक केली.

हुमैद उर रहमानची सध्या चौकशी केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत अटक करण्यात आलेला संशयित आरोपी ओसामा हुमैद उर रहमानचा भाचा आहे. लखनौमधून अटक करण्यात आलेला संशयित आमिरही हुमैद उर रहमानच्या माध्यमातून या नेटवर्कमध्ये सहभागी झाला होता.

गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी देशभरातून सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांना सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील एक जण मुंबईतील आहे. मुंबईतील धारावीतील एकाला अटक करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र एटीएसकडून प्रकरणाचा तपास केला जात आहे.

MUMBAI Terror Module: ATS in ‘Action Mode’! Another in custody from Mumbai; Humed-ur-Rehman also arrested in Prayagraj

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात