वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई मंत्रालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Man Threatening to Blow up Mumbai Mantralaya Is Arrested From Pune
ई-मेलद्वारे त्यानं ही धमकी दिली होती. पुण्यातील घोरपडीमधून त्याला अटक झाली. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. या व्यक्तीविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शैलेश शिंदे याला अटक झाली आहे. सोमवारी संध्याकाळी शैलेशने हा मेल केला होता. मुलीचं शाळेत अॅडमिशन न झाल्यानं त्यानं गृह विभागाला धमकीचा मेल केल्याचं समोर आले आहे. सोमवारी संध्याकाळी हा मेल आल्यानंतर डॉगस्कॉडद्वारे मंत्रालयात शोध घेण्यात आला. मात्र, स्फोटक वस्तू आढळलेली नाही. मात्र, खबरदारी म्हणून बंदोबस्त वाढवला आहे. मुंबई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे.
सध्या शैलेश मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. मंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी दिल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली होती. यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शैलेशने मुलीचं शाळेत अॅडमिशन न झाल्यानं हा मेल पाठवल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App