उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांना अटक

NCP Pune City President Prashant Jagtap Arrested For violating Covid 19 guidlines Ajit pawar

 Prashant Jagtap Arrested : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातील प्रचंड गर्दी पक्षाच्या शहराध्यक्षांना भोवली आहे. या कार्यक्रमातील गर्दीवर राज्यभरातून टीकेची झोड उठल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक करण्यात आली आहे. जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. NCP Pune City President Prashant Jagtap Arrested For violating Covid 19 guidelines Ajit pawar


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातील प्रचंड गर्दी पक्षाच्या शहराध्यक्षांना भोवली आहे. या कार्यक्रमातील गर्दीवर राज्यभरातून टीकेची झोड उठल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना अटक करण्यात आली आहे. जगताप यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवणारी ठरू शकते, असं सांगत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली होती. त्यानंतर जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी लोटली होती. कोरोना नियमांचे यामुळे उल्लंघन झालं होतं. खुद्द उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने हा प्रकार घडल्याने प्रचंड टीका सुरू झाली होती. यामुळे सर्वसामान्यांमध्ये चुकीचा संदेश गेला. यानंतर अखेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरीकडे, कार्यकर्त्यांऐवजी थेट अजित पवारांवरच गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. अजित पवार यांनी या गर्दीबाबत दिलगिरी व्यक्त केली. अशा पद्धतीनं गर्दी करायला नको होती, असं ते म्हणाले होते.

NCP Pune City President Prashant Jagtap Arrested For violating Covid 19 guidelines Ajit pawar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था