आम आदमी पार्टीचा पंजाबचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार शीख समुदायातून असेल; अरविंद केजरीवालांची घोषणा

Aam Aadmi Party's CM candidate for Punjab will be from the Sikh community says arvind kejriwal

CM candidate for Punjab : पंजाबमधली अख्खी आम आदमी पार्टी उठून काँग्रेसमध्ये निघून गेल्यानंतर जागे झालेल्या आम आदमी पक्षप्रमुखांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचा पंजाबचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हा शीख समूदायातूनच असेल, ही ती घोषणा आहे. Aam Aadmi Party’s CM candidate for Punjab will be from the Sikh community says arvind kejriwal


वृत्तसंस्था

अमृतसर : पंजाबमधली अख्खी आम आदमी पार्टी उठून काँग्रेसमध्ये निघून गेल्यानंतर जागे झालेल्या आम आदमी पक्षप्रमुखांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचा पंजाबचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हा शीख समूदायातूनच असेल, ही ती घोषणा आहे.

पंजाब काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंग विरूध्द नवज्योत सिंग सिध्दू असे राजकीय घमासान सुरू असताना आम आदमी पक्षाचे जवळजवळ सगळे आमदार फोडून मुख्यमंत्री अमरिंद सिंग यांनी आपल्या गोटात घेतले आहेत. काँग्रेसचे सिध्दू गटाचे आमदार विरोधात गेलेल्याला ही त्यांनी राजकीय तोड काढली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडपुढे आपला गट मजबूत दिसेल, असा त्यांचा राजकीय होरा आहे.

आम आदमी पक्षाचे एक एक आमदार फुटून काँग्रेसमध्ये जात असताना आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही हालचाली केल्या नाहीत. या आमदारांना काँग्रेसमध्ये जाण्यापासून रोखले नाही.

पण आता मात्र ते जागे झाले आहेत आणि त्यांनी घोषणा केली आहे, की आम आदमी पक्षाचा पंजाबचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार हा शीख समूदायातून असेल. ज्याच्याविषयी संपूर्ण पंजाबमध्ये अभिमानाची भावना असेल. पंजाबचे माजी पोलीस महानिरीक्षक कुवँर प्रताप सिंग यांनी अरविंद केजरीवालांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. कुवँर प्रताप सिंग हे आम आदमीचे पोलीसवाला म्हणून ओळखले जातात, असे केजरीवाल यांनी सांगितले.

Aam Aadmi Party’s CM candidate for Punjab will be from the Sikh community says arvind kejriwal

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात