विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबई : वांद्रे येथील हॉटेलचा संचालक कुणाल जानी ( NCB Arrested Kunal Jani) याला एनसीबीने अटक केली आहे. कुणाल जानी हा दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याचा मित्र होता. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी कुणाल जानी याला अटक केली आहे. ही अटक बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन (Bollywood Drugs Case) प्रकरणात करण्यात आली आहे.सुशांतच्या मृत्युनंतर कुणाल फरार होता. अखेर त्याला बुधवारी खार भागातून अटक करण्यात एनसीबीला यश आले आहे.Bollywood Drugs Case: NCB’s big action! Sushant’s friend Kunal Jani, director of Raj Kundra-Shilpa Shetty’s restaurant, arrested
Drugs cases related to the death of actor Sushant Singh Rajput | Narcotics Control Bureau (NCB) arrested hotelier Kunal Jani (in file pic) from Mumbai's Khar area. He was a close friend of Rajput and was absconding. pic.twitter.com/fxecPkv8rW — ANI (@ANI) September 30, 2021
Drugs cases related to the death of actor Sushant Singh Rajput | Narcotics Control Bureau (NCB) arrested hotelier Kunal Jani (in file pic) from Mumbai's Khar area. He was a close friend of Rajput and was absconding. pic.twitter.com/fxecPkv8rW
— ANI (@ANI) September 30, 2021
या आधी आगिसिल्स या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
आगिसिल्स हा अभिनेता अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडचा भाऊ आहे. आता त्यापाठोपाठ राज कुंद्राचा साथीदार आणि हॉटेल व्यावसिक कुणाल जानीला अटक करण्यात आली आहे.
कुणाल जानी हा 24/2020 च्या एका प्रकरणात वाँटेड होता. आता NCB ने त्याला अटक केली आहे. झोनल डायरेक्टर समीर डायरेक्टर यांनी ही माहिती दिली आहे. जानी यांची चौकशी करण्यात येते आहे. ड्रग्ज पेडलर आणि ड्रग्ज सिंडिकेट आम्ही गेल्या वर्षी उद्ध्वस्त केलं होतं. त्यासंदर्भातल्या काही लिंक्सची माहिती जानीकडून घेतली जाते आहे असंही समीर वानखडे यांनी सांगितलं.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर जेव्हा बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचं कनेक्शन समोर आलं होतं त्यातही कुणाल जानीचं नाव समोर आलं होतं. रिया चक्रवर्ती आणि कुणाल जानी यांच्यातले काही व्हॉट्स अप चॅट ईडीला यावेळी चौकशीदरम्यान सापडले होते. गेल्या वर्षीही कुणाल जानी याची एनसीबीने सहा तास चौकशी केली होती. त्याने आपला ड्रग्ज प्रकरणाशी काही संबंध नाही असं म्हटलं होतं. मात्र त्याचा संबंध आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
कुणाल जानी हा पॉर्न केसमध्ये अडकलेल्या राज कुंद्राचाही साथीदार आहे. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा आणि रणजीत सिंग बिंद्रा यांचं बांद्रा या ठिकाणी एक रेस्तराँ आहे. त्या ठिकाणी कुणाल जानी संचालक आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात रणजीत सिंग बिंद्राचीही याआधी चौकशी झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App