मुंबईत आणखी एका संशयित दहशतवाद्यास एटीएसकडून अटक


विशेष प्रतिनिधी

मुंबई: महाराष्ट्र एटीएसने संशयित दहशतवादी मोहम्मद इरफान रेहमत अली शेख याला अटक केली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या झाकीर या दहशतवाद्याच्या चौकशी नंतर एटीएसने मोहम्मद इरफान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि त्यानंतर त्याला अटक केली आहे.ATS arrests another suspected terrorist in Mumbai

संशयीत दहशतवादी झाकीर हुसेन शेख व रिझवान इब्राहिम मोमीन यांचा दहशतवाद विरोधी पथकाने (एसीटीएस) ताबा घेतला होता. ४ ऑक्टोबपर्यंत दोघांचाही ताबा एटीएसला मिळाला. या प्रकरणात आणखी एक अटक एसीटीएसने केली आहे.या संशयित दहशतवाद्याला मुंबईतील वांद्रे परिसरातून अटक करण्यात आली आहे. गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांशी संबंधित मुंबईतील ही तिसरी अटक आहे.

एटीएसने उघड केले की झाकीर आणि रिझवानच्या चौकशी दरम्यान मोठी माहिती समोर आली, त्यानंतर मोमीन याला नागपाडा येथील त्यांच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले आणि गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली.

ATS arrests another suspected terrorist in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण