आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे ; नवी मुंबईतील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य


वृत्तसंस्था

मुंबई : “या सरकारला माथाडींचे प्रश्न सोडवण्याची संधी आहे, तेही सोडवतील असा मला विश्वास आहे. नाही सोडवले, तर आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तेव्हा आम्ही ते प्रश्न सोडवू. तीही अडचण नाही. लोकशाहीमध्ये कमी-अधिक होत असतं. कधी हे असतात, कधी ते असतात. पण कामगारांचे प्रश्न पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवेत”, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत काही बिघडलं तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण होत आहे. Bjp devendra fadnavis on mathadi workers problems maharashtra government narendra modi

अण्णासाहेब पाटील यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा नवी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नवी मंबईत बोलताना भाजपाचं सरकार पुन्हा येईल, असा विश्वास व्यक्त केला.

फडणवीस म्हणाले. “माथाडींच्या चळवळीसाठी आमच्या काळात सरकारचे दरवाजे आम्ही पूर्णपणे उघडे केले होते. माथाडी नेत्यांनी कधीही प्रश्न मांडले की आम्ही ते सोडवायचो, अशी व्यवस्था आम्ही उभी केली होती. पुढचा काळ मिळाला असता, तर उरलेले प्रश्नही सोडवले असते”, असं ते म्हणाले.



“या सरकारला आता माथाडींचे प्रश्न सोडवण्याची संधी आहे, तेही सोडवतील असा मला विश्वास आहे. नाही सोडवले, तर आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तेव्हा आम्ही ते प्रश्न सोडवू. तीही अडचण नाही. लोकशाहीमध्ये कमी-अधिक होत असतं. कधी हे असतात, कधी ते असतात. पण कामगारांचे प्रश्न पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवेत”, असं फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

फेऱ्या सुरु झाल्या की ओळखावे ‘खतरा है ‘

औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजी-माजी- भावी असे उदगार काढले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जाम नाराज झाले होते. त्यांनी एकदम बाळासाहेबांच्या भूमिकेत जात कोथळ्याचा विषय काढला. या दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मातोश्री ते गोविंदबाग अशा निरोपाच्या फेऱ्या सुरु झाल्या होत्या. ठाणेकर आणि बारामतीकरांच्या राजकारणाच्या खेळात महागाई, कोरोनाने पिचलेल्या जनतेचे थोडेसे मनोरंजन मात्र फारच झाले. तिकडे शिंगरू मात्र मरतय हेलपाट्याने, अशी काहीशी अवस्था संजय राऊत यांची झाली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार पुन्हा येणार आहे, असे सांगितल्याने महाविकास आघाडीत चलबिचल होते का ते पहावे लागेल. आता महाविकास आघाडीचे संकटमोचक संजयजी पुन्हा मातोश्री ते गोविंदबाग अशा फेऱ्या मारतात का ? हे पहावे लागणार आहे. कारण त्यांच्या फेऱ्या सुरु होताच ओळखता येते की आघाडीत काही बिनसल आहे, आघाडीत ‘कुछ तो खतरा हैं !’ हे समजते.

कोरोनामुळे दसरा मेळावा ऑनलाइन होणार

महाविकास आघाडी सत्तेवर येऊन आता काही महिन्यात अडीच वर्षे होणार आहेत. मग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पायउतार होऊन राज्याला नवा मुख्यमंत्री हा आघाडीतून मिळणार की युतीतून मिळणार ? हे समजणार आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने नवे काही केले जात नाही. त्यामुळे दसऱ्याला सिम्मोलंघन कोण आधी करतो. हे कळणारच आहे. याशिवाय शिवसेनेचा दसरा मेळावा जवळ आला आहे. कोरोनामुळे सार्वजनिक सभा, मेळावे, याला गर्दी टाळण्यासाठी बंदी आहे. त्यामुळे दसरा मेळावा हा यंदाही ऑनलाइनच घ्यावा लागणार आहे. कोरोना काळात गर्दी करणे अयोग्य आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या प्रमाणे प्रत्येकाने वागायला हवे. मेळावे, सभा यांना राज्यात बंदी आहे. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी ही आवर्जून टाळली पाहिजे. किंबहुना फार फार तर ५० लोकांच्या उपस्थितीत हा ऑनलाइन मेळावा झाला पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयावेळी जशी गर्दी झाली तशी नको, सोलापुरात जयंत पाटील यांच्या मेळाव्याला झाली तशी नको, जून्नरच्या शरद पवार यांच्या कार्यक्रमात झाली तशीही नको. अगोदर कार्यक्रम आयोजित करायचे मग सारवासारव करायची असे करायला नको. मंदिरे, शाळा सुरु होत आहेत, हा चांगलाच निर्णय आहे. पण, राजकीय सभा, मेळावे, हे जरूर टाळलेच पाहिजेत. राजकीय कार्यक्रम, निवडणूक अशा ठिकाणी नागरिक हमखास गर्दी करतात. त्यातून कोरोनाचा प्रसार झाला तर आतापर्यंत आपण जे काही मिळविले ते घालवून बसू. त्यामुळे सभा, मेळावे यांना सरकारने परवानगी देऊ नये. ऑनलाइन कार्यक्रम हा मास्क, सॅनिटायझर आणि कमीत कमी लोकांमध्ये आटोपला पाहिजे. गेली दोन वर्षे जनतेने तुरुंगवास भोगालाच आहे. अर्थात तो आरोग्यासाठी फारच उपयुक्त होता. संयम तर पाळला आहे. आणखी एक वर्षे आपण गर्दी होणारे कार्यक्रम टाळलेच पाहिजेत. एकदा कोरोनाचा बाण धनुष्यातून सुटला तर तो काही मागे घेता येणार नाही. त्यामुळे राजकीय मंडळींनी संयम पाळावा आणि काळजी घ्यावी आणि गर्दी टाळावी.

Bjp devendra fadnavis on mathadi workers problems maharashtra government narendra modi

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात