जम्मू -काश्मीरवर घोंगावतेय तालिबानचे हिरवे संकट; सैन्याच्या तुकड्या वाढविण्याबरोबरच पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेण्याची गरज


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान बळकावल्यानंतर जगभरात जम्मू- काश्मीरच्या भवितव्याची चिंता व्यक्त होत आहे. या चिंतेत तथ्य आहे. त्यामुळे भारताने आता जम्मू -काश्मीरमध्ये सैन्याच्या तुकड्या आणखी वाढवून आणि पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन तालिबानी दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.Taliban’s green crisis over Jammu and Kashmir; Reqired to increse the number of troops, Pakistan-occupied Kashmir also needs to be taken over

शांततेची कबुतरे बंदुकीने ठार करण्याची मनोवृत्ती असलेल्या तालिबानी दहशतवाद्यांना बंदुकीचीच भाषा कळते. त्यामुळे लष्करी कारवाई हा एकच उपाय भारतासमोर आहे.



तालिबानी दहशतवादी आणि पाकिस्तान ‘सगे भाई नसले तर ‘चचेरे भाई’ नक्कीच आहेत. त्यात धार्मिक सामंजस्य हा एक कळीचा मुद्दा आहे. अफगाणिस्तान तालिबानने बळकावला असला तरी हक्कानी गटाच्या माध्यमातून अफगाणिस्तानवर पाकिस्तानने आपली पकड घट्ट केली आहे.

एकूणच तालिबानी आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मनसुबे जहाल आहेत. एकीकडे इस्लामिक कायदे लादून अफगाणिस्तानात मानावधिकाराचा गळा घोटला जात आहे. मुली आणि महिलांची अवस्था बिकट आहे. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानने बळकावला असून अकसाई चीन हा चीनच्या ताब्यात आहे. त्यामुळे अफगाणी दहशतवाद्यांना ‘आओ जावो राज तुम्हारा’ ,अशी परिस्थिती आहे.

त्यामुळे तेथील जनतेच्या सुरक्षेसाठी भारताने तेथे सैन्य पाठवून पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची गरज आहे. पाकिस्तानचा आणि चीनचा हा भूभाग नाही. त्यांनी तो जबरदस्तीने बळकावला आहे. अफगाणी दहशतवाद्यांनी पाकव्याप्त काश्मीर बळकावण्यापूर्वी किंवा त्यांनी आक्रमण करण्यापूर्वी भारताने आक्रमक कारवाई करून पाकव्याप्त भूभाग ताब्यात घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

भारताने आपल्या सीमा या अफगाणिस्तानशी थेट भिडविण्याची गरज आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील जनता दहशतवाद्यांच्या आक्रमणापासून वाचणार आहे. आतापर्यंत लाखोंच्या संख्येने अफगाणिस्तानी पाकिस्तानात दाखल झाले आहेत. त्यात किती दहशतवादी आहेत हा मुद्दा महत्वाचा आहे. अशा शरणार्थींचा ओघ जम्मू काश्मीरमध्ये सुरु झाल्यास ती भारतासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.

अफगाणिस्तान तालिबानने गिळंकृत केल्यानंतर जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांची वक्तव्ये पाहता ती तालिबानचे गुणगान करणारी आणि या राजवटीने इस्लामिक पद्धतीने राज्य चालावावे, अशा शब्दात त्यांचे स्वागत करणारी आहेत.

अशा वेळी त्यांनी धर्मनिरपेक्षता कुठे वळचणीला टांगली का ? , असा प्रश्न तथाकथित ढोंगी धर्मनिरपेक्ष पक्षांनी का विचारला नाही. मेहबुबा मुफ्ती त्यांचे वडील मुफ्ती मोहंमद सईद हे १९९९ मध्ये केंद्रीय गृहमंत्री असताना जम्मू काश्मीरमधून लाखोंच्या संख्येने काश्मिरी पंडितांना अतिरेक्यांनी हुसकावून लावले.

त्यांची घरेदारे स्थानिक मुस्लिमांनी बळकावली. तेव्हा काश्मीरियत कोठे होती ? तेव्हा धर्मनिरपेक्षतेच्या हाकाटी पिटणारे कोठे होते? पंडितांच्या पुनर्वसनासाठी कोणतीही पावले त्यावेळच्या सरकारने उचलली नाहीत. आता तेच संकट तालिबानच्या रूपाने पुन्हा जम्मू – काश्मीरमध्ये निर्माण होण्याची चिंता जागतिक पातळीवर चर्चेला आली आहे.

पण, हे संकट केवळ आता हिंदुपुरते मर्यादित नसून त्यात मुस्लिम सुद्धा भरडले जाणार आहेत. कारण तालिबानी राजवट ही बंदुकीच्या धाकावर चालते. तेथे लोकशाहीला आणि धर्मनिरपेक्षतेला कोणताही थारा नाही. तालिबानींचे गोडवे गाणाऱ्यांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

तालिबानी दहशतवाद्यांचा फटका बसला तर तो हिंदूंबरोबर मुस्लिमाना बसणार आहे. त्यामुळे तमाम भारतीय नागरिकांनी आताच सावध व्हावे आणि या तालिबानी दहशतवाद्यांचा एकजुटीने सामना करण्यासाठी सज्ज होण्याची गरज आहे.

दहशतवादाचा उंट आणि नाग वेळीच ठेचावा

अफगाणिस्तानातील घडामोडीकडे डोळे मिटून त्या देशाचा अंतर्गत प्रश्न आहे, असे समजून गाफील राहिल्यास भारताला भविष्यात मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे. अफगाणिस्तानचा एकेकाळचा काबुलीवाला आणि आताच तालिबानवाला यात जमिन आस्मानाचा फरक आहे. संकट दारावर आहे.

त्यामुळेच दहशतवादाचा उंट तंबूत शिरण्यापूर्वी किंवा दहशतवादाचा नाग फणा काढून डसण्यापूर्वी त्याचा फणा हा ठेचणे हीच काळाची गरज आहे. दहशतवादाचे पक्षी दाणे टिपून गेल्यावर मग शांतता, सहिष्णुता याच्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही. कारण या बाबी उरणारच नाही. कारण अफगाणिस्तानचे उदाहरण सध्या समोरच आहे.

Taliban’s green crisis over Jammu and Kashmir; Reqired to increse the number of troops, Pakistan-occupied Kashmir also needs to be taken over

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात