मोठी बातमी : कम्युनिस्ट कन्हैया होणार काँग्रेसी, जिग्नेश मेवानीसह 28 सप्टेंबरला होणार प्रवेश सोहळा

CPI leader Kanhaiya Kumar and Jignesh Mewani to join Congress on September 28th

Kanhaiya Kumar and Jignesh Mewani to join Congress : कम्युनिस्ट नेता कन्हैया कुमार आणि गुजरातचे आरडीएएम आमदार जिग्नेश मेवानी 28 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी कन्हैया कुमारला सोबत येण्याची ऑफर दिली होती, पण तेव्हा ते शक्य झाले नाही. अलीकडेच कन्हैया कुमारने राहुल गांधी यांची भेट घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमारसाठी पक्षाची योजना आहे, ती अंमलात आणली जाईल. बिहारमध्ये काँग्रेस लवकरच आपल्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करू शकते. CPI leader Kanhaiya Kumar and Jignesh Mewanito join Congress on September 28th


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कम्युनिस्ट नेता कन्हैया कुमार आणि गुजरातचे आरडीएएम आमदार जिग्नेश मेवानी 28 सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी कन्हैया कुमारला सोबत येण्याची ऑफर दिली होती, पण तेव्हा ते शक्य झाले नाही. अलीकडेच कन्हैया कुमारने राहुल गांधी यांची भेट घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्हैया कुमारसाठी पक्षाची योजना आहे, ती अंमलात आणली जाईल. बिहारमध्ये काँग्रेस लवकरच आपल्या नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा करू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते बऱ्याच काळापासून काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात होते. अलीकडेच कन्हैया कुमारने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्याचबरोबर जिग्नेश मेवाणीदेखील काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात आहेत. उत्तर गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील वडगाम मतदारसंघातून उमेदवार न उभा करून काँग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुकीत जिग्नेशला मदत केली होती.

दोन्ही नेते काँग्रेस नेतृत्वाच्या संपर्कात

 

कन्हैया बिहारमध्ये काँग्रेससाठी चमत्कार घडवणार?

बिहारच्या राजकारणात कन्हैया कुमारला महत्त्वाची भूमिका बजावण्याची इच्छा असल्याचे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. बिहारमध्ये कॉंग्रेसने आपले सहयोगी राजद आणि सीपीआयपेक्षाही वाईट कामगिरी केली. काँग्रेसला 70 पैकी फक्त 19 जागा मिळाल्या होत्या. तर राजदने 144 पैकी निम्म्याहून अधिक जागा जिंकल्या आणि CPIने 19 पैकी 12 जागा जिंकल्या.

कन्हैया आणि जिग्नेशच्या प्रवेशामुळे काँग्रेसला बळ मिळण्याची आशा

गेल्या दोन वर्षांत अनेक तरुण नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया, सुष्मिता देव, जितिन प्रसाद आणि प्रियंका चतुर्वेदी यांची नावे यात समाविष्ट आहेत. कन्हैया आणि जिग्नेश काँग्रेसमध्ये सामील झाल्यास पक्ष त्यांचा वापर उत्तर प्रदेशातील पूर्वांचल प्रदेशात प्रचारासाठी करू शकतो. कारण सपा-बसपने स्पष्ट केले आहे की, ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसशी हातमिळवणी करणार नाहीत, पक्ष स्वबळावर निवडणुका लढेल.

CPI leader Kanhaiya Kumar and Jignesh Mewanito join Congress on September 28th

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात