कोरोना लसीकरणात गोव्याने रचला विक्रम, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा, राज्यातील एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 50 टक्के लसीकरण पूर्ण


 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. गोव्याच्या एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 50 टक्के पूर्ण लसीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्याभरापूर्वीच गोव्यातील पूर्ण प्रौढ लोकसंख्येसाठी लसीकरणाचा एक डोस पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. गोव्यात, कोविड-19 लसीचा किमान एक डोस संपूर्ण लोकसंख्येच्या 100 टक्के लोकांना दिला गेला आहे. Goa CM Pramod Sawant Says 50 percent of eligible population are fully inoculated with covid vaccine


विशेष प्रतिनिधी

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. गोव्याच्या एकूण प्रौढ लोकसंख्येच्या 50 टक्के पूर्ण लसीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवड्याभरापूर्वीच गोव्यातील पूर्ण प्रौढ लोकसंख्येसाठी लसीकरणाचा एक डोस पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. गोव्यात, कोविड-19 लसीचा किमान एक डोस संपूर्ण लोकसंख्येच्या 100 टक्के लोकांना दिला गेला आहे.

गोव्याने रचला विक्रम

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करून गोव्याच्या एकूण पात्र लोकसंख्येच्या 50 टक्के पूर्ण लसीकरणाची माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आणखी एका नेत्रदीपक यश, गोव्यातील 50 टक्के पात्र लोकांना आता 2 डोसचे पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. या कामात सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार आणि अभिनंदन. आमच्या निरंतर प्रयत्नांमुळे लवकरच सर्वांना राज्यात पूर्णपणे लसीकरण केले जाईल.

18 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांनी केले होते अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 सप्टेंबर रोजी एका व्हर्च्युअल संवादादरम्यान, आरोग्य सेवा कामगार, डॉक्टर, नागरिक आणि गोवा सरकारचे कोविड -19 लसीचा किमान एक डोस राज्यातील पात्र लोकसंख्येच्या 100 टक्क्यापर्यंत नेल्याबद्दल अभिनंदन केले. या संवादात माहिती देताना पंतप्रधान म्हणाले होते की, हिमाचल प्रदेश, गोवा, चंदिगड, लक्षद्वीपमध्ये एकूण पात्र लोकसंख्येच्या 100 टक्के लोकांना कोविड -19 लस देण्यात आली आहे. याशिवाय, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार, लडाख, केरळ, उत्तराखंड आणि दादर नगर हवेलीमध्ये ही कामगिरी लवकरच साध्य होईल.

Goa CM Pramod Sawant Says 50 percent of eligible population are fully inoculated with covid vaccine

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण