रिव्यू : एक थी बेगम २, अनुभवा पहिल्या सिजन पेक्षाही अधिक थ्रिलर


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एक थी बेगमच्या पहिल्या सीजनच्या शेवटी आपण बघितलं की, अश्रफला गोळी लागते. तेव्हा सगळ्यांना वाटतं की आता अश्रफ जिवंत राहणार नाही. पण दुसऱ्या सीझनचा टीझर आल्यानंतर आपल्याला हे कळाले की अश्रफ वाचली असून ती आता बदला घेण्यासाठी परत आली आहे. अश्रफ लीला पासवान या नावाने आता तिचा बदला कसा घेते हे आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये खूप प्रमाणात हिंसा आणि बोल्ड सीन्स आहेत. तर आता आपण बघुया सिरिजचे काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स.

Ek thi Begum 2 series review

सिरीजचे पोसिटिव पॉइंट्स

कुठलाही स्पोईलर न देता सांगायचं झालं तर, हा सिझन पहिल्या सीजन पेक्षा जास्त डार्क आणि थ्रिलर आहे. ८०’s च्या काळातील ह्या सिरीजमधील ॲक्शन सीन्स हे वास्तविक आणि पाहण्याजोगी आहेत. अनुजा साठेनी पूर्ण सिरीजचा भार उत्तमरित्या पेलला आहे. त्याबरोबरच चिन्मय मांडलेकर, अभिजीत चव्हाण आणि संतोष जुवेकर यांचा अभिनय उत्तम झालेला आहे. फॅमिली मेन फेम शहाब अली याची भूमिकासुद्धा उत्तम झालेली आहे. डायलॉग, कथा आणि क्लायमॅक्स वाखाणण्याजोगे आहेत.


एक थी बेगम-२ टीजर प्रदर्शित, अश्रफची कहाणी पुढे सुरू, पतीच्या मृत्यूचा बदला घेणार


निगेटिव्ह पॉईंट्स

सिरीजचा निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल बोलायचे झाले तर,   लीड कलाकार सोडून यामध्ये जी नवीन पात्र ऍड केली आहेत त्यांना कमी महत्त्व दिले आहे. ८० च्या दशकातील वातावरण दाखवण्यास सिरीज असफल झाली आहे.

निष्कर्ष:

या सिरीज मधे एकूण १२ एपिसोड्स आहेत. पूर्ण वेब सिरीज पाहण्यासाठी तुम्हाला ७ ते ८ तास द्यावे लागतील. ही सिरीज नक्की पाहण्याजोगी आहे. यामध्ये खूप ट्विस्ट आणि सस्पेन्स आहे. थ्रिलर सिरीजच्या चाहत्यांसाठी ही एक मस्ट वॉच सिरीज आहे असे म्हणायला हरकत नाही.

Ek thi Begum 2 series review

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात