एक थी बेगम-२ टीजर प्रदर्शित, अश्रफची कहाणी पुढे सुरू, पतीच्या मृत्यूचा बदला घेणार


विशेष प्रतिनिधी

मुंबई: सस्पेन्स आणि ड्रामा यांनी भरलेल्या ‘एक थी बेगम’ या सीरिजचा पहिला सीझन संपल्यानंतर दुसऱ्या सिझनची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. या सीरिजच्या दुसर्‍या सीझनचा टीझर प्रदर्शित झाला आहे. सीरिजचे सर्व भाग ३० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येणार आहेत.

Ek thi Begum 2 teaser release, Ashraf is back to revenge her husband

अभिनेत्री अनुजा साठे, अश्रफ भाटकरच्या भूमिकेत परत येणार आणि या वेळी लीला पासवान या नावाने ती सीरीजमध्ये दिसेल. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या सीरिजच्या पहिल्या सिझनमध्ये अश्रफ भाटकर, ही सपना या नावाने एका बार डान्सरच्या वेषामध्ये तिच्या पतीच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या सर्वांचा बदला घेण्यासाठी योजना आखत जाते. परंतु तिच्या सर्व योजना या निष्फळ ठरतात आणि सीरिजच्या शेवटी तिच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात येतो. टीजरमध्ये जास्त काही रिव्हिल केलेलं नाही. ३० सप्टेंबरला अशरफ लीला पासवान या नावाने अंडरवर्ल्डमध्ये कशी वावरते आणि ती आपल्या पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यात यशस्वी होईल का हे पाहायला मिळेल.


सोशल मीडियावर नेटफ्लिक्स बंदीची मागणी, नवी वेब सिरीज ‘नवरस’वर युजर्सची आक्षेप


 

टीझर पाहिल्यानंतर हे लक्षात येते की, हा सीझन पहिल्या सीझनप्रमाणेच सस्पेन्स, ट्विस्ट, ड्रामा इंटिमसी, इमोशन या सर्वांनी भरलेला असेल. सीरिजचे दिग्दर्शन सचिन दरेकर यांनी केलेले आहे.  अनुजा साठे बरोबरच या सीरिजमध्ये चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसत्कर, अंकित मोहन आणि लोकेश गुप्ते हे कलाकारही असतील.

Ek thi Begum 2 teaser release, Ashraf is back to revenge her husband

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात