लहान मुलांनाही लवकरच लस, लशींच्या चाचण्या पूर्णत्वाच्या मार्गावर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली  : अठरा वर्षांखालील मुलांचे देखील लवकरच लसीकरण सुरू होऊ शकते, यासाठीच्या लशींच्या रुग्णालयांतील चाचण्या आता पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याची माहिती केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात दिली.vaccinae will available for children in coming days

यासाठीचा सगळा कायदेशीर आराखडा हा सरकारी पातळीवर तयार करण्यात येईल, तज्ज्ञांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतरच लहान मुलांचे देखील लसीकरण करण्यात येईल, असेही केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने वेगाने पावले उचलायला सुरुवात केली आहे.



यावर मुख्य न्या. डी. एन. पटेल आणि न्या. ज्योती सिंह यांच्या खंडपीठाने आधी चाचण्या पूर्ण होऊ द्या, या चाचण्यांशिवाय लस देण्यात आली तर मोठे संकट निर्माण होईल असे सांगितले. एकदा या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर सरकारने देखील तातडीने मुलांचे लसीकरण करावे, अवघा देश याची वाट पाहतो आहे, असे न्यायालयाने नमूद केले. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी ६ सप्टेंबर रोजी होईल.

vaccinae will available for children in coming days

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात