Rahul Gandhi RSS Statement may Creates Controversy in Congress leaders

ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी RSS मध्ये जा, कोणत्या नेत्याबद्दल म्हणाले राहुल गांधी?

Rahul Gandhi RSS Statement : पंजाब कॉंग्रेसमधील गोंधळ शांत झाला नसला तरी कॉंग्रेसमध्ये आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे. याचे कारण राहुल गांधी यांचे वक्तव्य आहे, यात त्यांनी स्वत:च्या पक्षातील नेत्यांना भाजपला घाबरणारे आणि आरएसएसचे समर्थक ठरवले आहे. यामुळे राहुल गांधी नेमकं कुणाला उद्देशून हे म्हणत आहेत, असा प्रश्न पडतो. Rahul Gandhi RSS Statement may Creates Controversy in Congress leaders


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंजाब कॉंग्रेसमधील गोंधळ शांत झाला नसला तरी कॉंग्रेसमध्ये आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे. याचे कारण राहुल गांधी यांचे वक्तव्य आहे, यात त्यांनी स्वत:च्या पक्षातील नेत्यांना भाजपला घाबरणारे आणि आरएसएसचे समर्थक ठरवले आहे. यामुळे राहुल गांधी नेमकं कुणाला उद्देशून हे म्हणत आहेत, असा प्रश्न पडतो.

कॉंग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या स्वयंसेवकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “असे बरेच लोक आहेत जे घाबरत नाहीत. ते कॉंग्रेसबाहेर आहेत. ते सर्व आपले आहेत आणि त्यांना पक्षात आणले पाहिजे. ज्यांना येथे भीती वाटते त्यांना बाहेर फेकले पाहिजे. तुम्ही आरएसएसचे असाल तर निघा पळा, मजा करा. आम्हाला तुमची गरज नाही. आम्हाला निर्भयी माणसांची गरज आहे. ही आमची विचारधारा आहे.” यादरम्यान राहुल गांधींनी पक्षातून बाहेर जाणाऱ्या नेत्यांवर हल्लाबोल केला आणि म्हणाले की, ज्यांना भीती वाटते, ते जाऊ शकतात.

अशा परिस्थितीत आता प्रश्न उपस्थित होत आहेत की, राहुल गांधींनी हा तिखट हल्ला कोणावर केला? ज्या जी-23 नेत्यांनी कॉंग्रेस नेतृत्वाला आव्हान दिले त्यांना पक्ष सोडून जाण्याविषयी म्हटले आहे की त्यांच्या निशाण्यावर एकेकाळचे जवळचे मित्र आहेत, जे आता पंतप्रधान मोदींचे लाडके बनले आहेत. याशिवाय राहुल गांधींना स्वत:च्या नेत्यांवर विश्वास नाही का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

राहुल गांधींच्या वक्तव्याचा अर्थ काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित राहुल गांधींच्या विधानाचा अर्थ काय आहे हे समजून घेण्यासाठी त्यांचे वागणे पाहावे लागेल. एकीकडे त्यांनी पक्षातून बाहेर पडणार्‍या नेत्यांवर हल्ला केला आणि दुसरीकडे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना भाजपला घाबरू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. भाजपवर कोणाचाही विश्वास नाही, असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत उत्तम काम केले आहे, असे जेव्हा पंतप्रधान म्हणतात तेव्हा लोक त्यांच्यावर हसतात. जेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की, चीन आमच्या सीमेत आला नाही तेव्हा लोक त्यांच्यावर हसले. सर्वांना माहिती आहे. तुम्ही लोक सत्याचे समर्थन करता, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल यांच्या जवळचे लोक पक्ष का सोडत आहेत?

वास्तविक, 2019 च्या पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये राजकीय संकट गडद झाले आहे. पण राहुल गांधी यांचे जवळचे लोक पक्ष सोडत का आहेत हा प्रश्न आ वासून उभा आहे. ज्यांनी पक्ष सोडला त्यातील सर्वात मोठे नाव ज्योतिरादित्य सिंधियांचे आहे. जे राहुल गांधींसोबत संसद ते रस्त्यापर्यंत वावरले. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत सिंधिया हाच कॉंग्रेसचा चेहरा होता, परंतु कॉंग्रेसने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि कमलनाथ यांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवले. याचा परिणाम असा झाला की, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेसचे सरकार पाडले आणि भाजपच्या रथावर स्वार झाले. सिंधियांबद्दल राहुल गांधी म्हणाले की, जर सिंधिया कॉंग्रेसमध्ये असते तर ते नक्कीच मुख्यमंत्री झाले असते. ते भाजपचे बॅकबेंचर झाले आहेत.

कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देणारे हेमंत सरमा आसामचे मुख्यमंत्री बनले

दुसरीकडे, कॉंग्रेस आता राहुल गांधींच्या वक्तव्याचा बचाव करू पाहत आहे. पण हेही सत्य आहे की कॉंग्रेसचे अनेक नेते राहुल यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्न करत पक्षातून बाहेर पडले आणि ते भाजपच्या ताकदीचे कारण बनले. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे हेमंत बिस्वा सरमा, त्यांना राहुल गांधींनी वेळ दिला नव्हता. त्यांना बोलण्याऐवजी राहुल गांधी आपल्या कुत्र्याशी खेळत राहिले, असे सरमांनी सांगितलेले आहेच. 2015 मध्ये कॉंग्रेस सोडलेल्या आणि भाजपमध्ये सामील झालेल्या हिमंता बिस्वा सरमा यांनी 2016च्या आसाम निवडणुकीत भाजपला बळकटी दिली. फक्त आसामच नव्हे, तर ईशान्य भारतात भाजपच्या विस्तारामागे ही सरमा यांचा वाटा आहे.

Rahul Gandhi RSS Statement may Creates Controversy in Congress leaders

महत्त्वाच्या बातम्या