Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेवर कोरोनाचं सावट, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ऑलिम्पिक व्हिलेजमधील एकाला लागण

Covid case found at athletes village, raising fears ahead of Tokyo Olympics

Tokyo Olympics : अवघ्या एका आठवड्यानंतर खेळांचा महाकुंभ असलेल्या ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. यावेळी जपानला या खेळांच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. टोकियोमध्ये खास ऑलिम्पिक व्हिलेज बनवण्यात आले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊनही या ऑलिम्पिक व्हिलेजमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. आयोजकांनीच याबद्दल माहिती दिली आहे. 23 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होईल, तर 8 ऑगस्टला स्पर्धेचा समारोप होणार आहे. Covid case found at athletes village, raising fears ahead of Tokyo Olympics


वृत्तसंस्था

टोकियो : अवघ्या एका आठवड्यानंतर खेळांचा महाकुंभ असलेल्या ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. यावेळी जपानला या खेळांच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. टोकियोमध्ये खास ऑलिम्पिक व्हिलेज बनवण्यात आले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊनही या ऑलिम्पिक व्हिलेजमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. आयोजकांनीच याबद्दल माहिती दिली आहे. 23 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होईल, तर 8 ऑगस्टला स्पर्धेचा समारोप होणार आहे.

टोकियो ऑलिम्पिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुटो यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ऑलिम्पिक व्हिलेजमधील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. खेळांच्या आयोजनामध्ये सहभागी होण्यासाठी परदेशातून आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. गोपनीयतेमुळे त्यांनी कोरोना बाधित व्यक्तीची माहिती दिलेली नाही. दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्ध एक वर्ष उशिराने सुरू होत आहेत. अजूनही कोरोना जगातून हद्दपार झालेला नाही, यामुळे आलिम्पिक स्पर्धेत सहभागासाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी येणाऱ्यांना विलगीकरणातही राहावं लागणार आहे.

दुसरीकडे, ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागासाठी आज भारतीय संघ टोकियोच्या दिशेने रवाना होत आहे. या संघात 119 खेळाडूंचा सहभाग आहे. भारतीय ओलिम्पिक संघाने आधी माहिती दिली होती की, 199 खेळाडूंसह 228 सदस्यांचे दल टोकियोला पाठवले जाईल. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या 119 खेळाडूंमध्ये 67 पुरुष खेळाडू आहेत, तर 52 महिला खेळाडू आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा म्हणाले, ”टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय दलाची एकूण संख्या 228 असेल. यात 67 पुरुष खेळाडू आणि 52 महिला खेळाडू असतील. आम्ही 85 पदक स्पर्धांमध्ये आव्हान सादर करू.”

Covid case found at athletes village, raising fears ahead of Tokyo Olympics

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात