Pandharpur ashadhi Wari ST Corp Directes To Not Run Any Bus during Ashadhi Ekadashi to Pandharpur

Ashadhi Wari : पंढरपुरात संचारबंदी, आंतरजिल्हा नाकेबंदीही कडक, इतर जिल्ह्यातून पंढरपुरात एकही एसटी बस न सोडण्याचे महामंडळाचे आदेश

Ashadhi Wari : कोरोना महामारीच्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने एकही एसटी बस सोडण्यात येऊ नये, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने राज्यातील सर्व विभागांना दिले आहेत. आषाढी एकादशी यावर्षी 20 जुलै रोजी आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी जमतात. परंतु सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे खबरदारी म्हणून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. वारीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते, असे असूनही महामंडाळाने हा निर्णय घेतला आहे. Pandharpur ashadhi Wari ST Corp Directes To Not Run Any Bus during Ashadhi Ekadashi to Pandharpur 


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोना महामारीच्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी पंढरपूरच्या दिशेने एकही एसटी बस सोडण्यात येऊ नये, असे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने राज्यातील सर्व विभागांना दिले आहेत. आषाढी एकादशी यावर्षी 20 जुलै रोजी आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी जमतात. परंतु सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे खबरदारी म्हणून गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. वारीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते, असे असूनही महामंडाळाने हा निर्णय घेतला आहे.

महामंडळाने दिलेले हे आदेश सर्व जिल्ह्यांसाठी दि. 17 जुलै दुपारी 2 वाजेपासून ते दि. 25 जुलै सायंकाळी 4 वाजेपर्यंत लागू राहतील. या काळात कोणत्याही जिल्ह्यातून पंढरपुराकडे एसटीला येण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय पंढरपूरमधून आरक्षणासाठी उपलब्ध केलेल्या सर्व फेऱ्या तातडीने रद्द करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय आंतरराज्य आणि आंतरजिल्हा नाकेबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने कोरोना संकटामुळे यावर्षीही पायी वारीसाठी बंदी घातली आहे. तरीदेखील भाविक चोरट्या मार्गाने पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे महामंडळाकडून असे आदेश देण्यात आले आहेत. राज्य शासनाने या वेळी केवळ मानाच्या 10 पालख्यांनाच परवानगी दिली आहे. 19 जुलै रोजी संतांच्या पादुका एसटी बसने पंढरपूरकडे रवाना होतील. तत्पूर्वी, इतर सर्व सोहळे वारकऱ्यांच्या मर्यादित संख्येने उपस्थितीत साजरे करण्यात आले आहेत.

Pandharpur ashadhi Wari ST Corp Directes To Not Run Any Bus during Ashadhi Ekadashi to Pandharpur

महत्त्वाच्या बातम्या