शेतकरी कन्यांचे उडाण, एकाच कुटुंबातील तीन बहिणी आयएएस आणि आयआरएस

विशेष प्रतिनिधी

बरेली : वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुलाचाच हट्ट धरणाऱ्यांच्या डोळ्यात उत्तर प्रदेशातील पाच बहिणींनी अंजन घातले आहे. बरेली येथील एका शेतकऱ्याच्या कुटुंबातील पाच मुलींपैकी तिघी शासकीय अधिकारी बनल्या आहेत. 5 मुलींपैकी 2 आयएएस अधिकारी व 1 मुलगी आयआरएस अधिकारी आहेत. दोन मुली इंजिनिअर म्हणून नोकरी करत आहेत. Three sisters from farmer family become IAS and IRS

उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील चंद्रसेन सागर आणि मीना देवी यांना पहिली मुलगी झाली. त्यानंतर, एका पाठोपाठ एक अशा 5 मुली कुटुंबात जन्मास आल्या. 5 मुलींचा  जन्म झाल्यानंतरही आनंद होता. पण, गावातील आणि समाजातील काही लोकांकडून मुलींच्या जन्मामुळे टोमणे मारण्यात येत होते. 5 मुली झाल्यामुळे समाज व नातेवाईकांकडून खासगीत बोलताना, काय मुलींना आयएएस बनवणार आहात का? अशीही विचारणा केली जात होती. मात्र, या मुलींनी सगळ्यांना कृतीतून उत्तर दिले.

मुलींच्या आयएएस बनण्यात मुलींची हुशारी, मेहनत आणि त्यांच्या आईने केलेल्या काबाडकष्टांचे मोठे योगदान आहे. मुलींच्या शिक्षणाची सुरुवात बरेली येथील सेंट मारिय कॉलेजमधून झाली. त्यानंतर, उत्तराखंड, इलाहाबाद आणि दिल्ली येथे जाऊन पुढील उच्च शिक्षण घेतले.

तीन बहिणींनी दिल्लीत राहून भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची (यूपीएससी) तयारी केली. चंद्रसेन यांची पहिली मुलगी अर्जित 2009 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. सध्या मुंबईत जॉईंट कमिश्नर कस्टम कार्यालयात रुजू झाली. अर्जित यांचे लग्न आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे झाली असून तिचे पतीही आयएएस अधिकारी आहेत. सहा वषार्नंतर म्हणजेच 2015 मध्ये चंद्रसेन यांची दुसरी मुलगी अर्पितही आयएएस झाली. अर्पित सध्या वालसाड येथे डीडीओ पदावर कार्यरत आहेत. तिसरी आणि चौथी मुलगी इंजिनिअर झाल्या आहेत. त्या मुंबई आणि दिल्ली येथे नोकरी करत आहे. पाचवी मुलगी आकृतीही २०१६ मध्ये आयएएस झाली आहे. सध्या ती पाणी महामंडळाच्या संचालपदी रुजू आहेत.

या तिघीनाही आपल्या मामाकडून यूपीएससी परीक्षेची प्रेरणा मिळाली. त्यांचे मामा अनिल कुमार हे 1995 सालच्या युपीएससी परीक्षेतून आयपीएस अधिकारी बनले होते. त्यामुळे, आपणही आपल्या मामाप्रमाणेच मोठं अधिकारी व्हायचं असं स्वप्न या मुलींनी पाहिले होते. अनिल कुमार यांनीही आपल्या भाच्यांना मदत आणि मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांना आपले आणि आई-वडीलांचे स्वप्न पूर्ण करता आले.

Three sisters from farmer family become IAS and IRS

महत्त्वाच्या बातम्या