Twitter Down Globally : जगभरात ट्विटर ठप्प, युजर्सना ट्वीट करायला येतेय अडचण, लॉगआऊटचा येतोय मेसेज

Twitter Down Globally users Facing difficulty in tweeting

Twitter Down Globally : जगप्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्वीटरच्या सेवा जगभरात ठप्प झाल्या आहेत. वापरकर्त्यांना ट्वीट करायला अडचणी येत आहेत. जगभरात ट्वीटरच्या सेवेवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. जगभरातील युजर्सना ट्वीट टर्म सर्च करण्यास आणि ट्वीट अपलोड करण्यास अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेकांना लॉगआऊट, लॉगइन त्रुटींचा सामना करावा लागतोय. अशाच अनेक तक्रारी जगभरातून येत आहेत. Twitter Down Globally users Facing difficulty in tweeting


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्वीटरच्या सेवा जगभरात ठप्प झाल्या आहेत. वापरकर्त्यांना ट्वीट करायला अडचणी येत आहेत. जगभरात ट्वीटरच्या सेवेवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. जगभरातील युजर्सना ट्वीट टर्म सर्च करण्यास आणि ट्वीट अपलोड करण्यास अडचणींचा सामना करावा लागतोय. अनेकांना लॉगआऊट, लॉगइन त्रुटींचा सामना करावा लागतोय. अशाच अनेक तक्रारी जगभरातून येत आहेत.

थोड्या वेळाने ट्राय करा, असाच मेसेज युजर्सना येत आहे. दिसायला हे सर्व सर्वसाधारण प्रॉब्लेम वाटत असले तरी यामुळे जगभरातील वापरकर्त्यांवर परिणाम झाला आहे. याआधी सकाळी ट्वीटडेकची सेवा ठप्प झाली होती. दुसरीकडे, ट्वीटरकडून या अडचणी लवकरच दूर होतील, असे आश्वासन देण्यात आले आहे.

आज सकाळजी जगभरात ट्वीटर अॅक्सेस इश्यूमुळे अनेकांना त्रास झाला. ट्वीटरनेही ही त्रुटी कबूल केली होती. दिवसभरात ही अडचण पूर्णपणे दूर होईल, असे आश्वासन ट्वीटरद्वारे देण्यात आले होते. एका वृत्तानुसार 40 हजारांहून अधिक वापरकर्त्यांवर याचा थेट परिणाम झाला आहे.

Twitter Down Globally users Facing difficulty in tweeting

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात