निर्लज्ज राजकारण थांबवा; महाराष्ट्राला सर्वात जास्त ऑक्सिजनचा पुरवठा, पीयूष गोयल कडाडले

Stop shameless politics; Maharashtra has highest oxygen supply, Piyush Goyal hits back after Malik's allegations

Piyush Goyal : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यावरून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रावर ऑक्सिजन आणि रेमेडिसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून केंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या याच आरोपांचा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि मनसुख मंडावीया यांनी समाचार घेतला आहे. Stop shameless politics; Maharashtra has highest oxygen supply, Piyush Goyal hits back after Malik’s allegations


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यावरून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रावर ऑक्सिजन आणि रेमेडिसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून केंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या याच आरोपांचा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि मनसुख मंडावीया यांनी समाचार घेतला आहे.

तत्पूर्वी उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा करण्यास सांगितले. पण त्यांना सांगितले गेले की, पंतप्रधान बंगालमध्ये आहेत. ते बोलू शकणार नाहीत. जेव्हा ते परत येतील, तेव्हा ते बोलतील.

ठाकरे सरकारची नौटंकी पाहून वाईट वाटतंय : पीयूष गोयल

ठाकरे सरकारच्या आरोपांना पीयूष गोयल यांनी अनेक ट्विटमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी लिहिले, ठाकरे सरकारची ऑक्सिजनबाबत नौटंकी पाहून मला वाईट वाटतंय. भारत सरकार सर्व स्टेकहोल्डर्ससोबत जास्तीत जास्त ऑक्सिजन उत्पादन सुनिश्चित करत आहे. आम्ही सध्या उत्पादन क्षमतेच्या 110% ऑक्सिजन उत्पादन करत आहोत आणि उपलब्ध सर्व ऑक्सिजनचे औद्योगिक वापरावरून वैद्यकीयमध्ये रूपांतर करत आहोत.

महाराष्ट्राला आतापर्यंत सर्वाधिक ऑक्सिजन

पीयूष गोयल म्हणाले, महाराष्ट्राला आतापर्यंत भारतात सर्वाधिक ऑक्सिजन मिळाला आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या गरजांचे आकलन करण्यासाठी आणि राज्य सरकारांना शक्य तितक्या चांगल्या मार्गाने मदत करण्यासाठी केंद्र त्यांच्याशी सतत संपर्क साधत आहे.

ते म्हणाले की, शुक्रवारीच पंतप्रधानांनी आपल्या समीक्षेत म्हटले आहे की, या संकटात केंद्र आणि राज्यांनी एकत्र काम केले पाहिजे. एवढे सगळे असूनही ठाकरे सरकारने केलेले घाणेरडे राजकारण पाहून मला दु:ख व धक्का बसला आहे. त्यांनी आता या प्रकारचे राजकारण थांबवण्याची गरज आहे.

उद्ध्व ठाकरेंनी माझे राज्य माझी जबाबदारी नीट सांभाळावी

पीयूष गोयल म्हणाले, महाराष्ट्र भ्रष्ट सरकारशी संघर्ष करत आहे. दुसरीकडे, केंद्र सर्वसामान्यांसाठी चांगले देण्याचा प्रयत्न करत आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडण्याची गरज आहे. राज्यातील लोक माझे कुटुंब माझी जबाबदारी नीट सांभाळत आहेत, आता उद्धव ठाकरे यांनी माझे राज्य माझी जबाबदारी नीट सांभाळली पाहिजे.

नवाब मलिक म्हणाले – आम्ही कंपन्यांतून रेमेडिसिव्हीरचा साठा जप्त करू

महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी असा दावा केला की, आम्ही 16 निर्यात कंपन्यांकडून रेमडेसिव्हीरची मागणी केली. परंतु या कंपन्यांना महाराष्ट्रात पुरवठा न करण्याची धमकी देण्यात आली आहे. महाराष्ट्राला पुरवठा केल्यास त्यांचा परवाना रद्द करण्याचा इशारा कंपन्यांना देण्यात आला आहे. असे असेल तर आम्ही या कंपन्यांतील रेमडेसिव्हीरचा साठा जप्त करू, असा इशाराही नवाब मलिकांनी दिला.

मनसुख मंडलियांकडून मलिकांना सडेतोड उत्तर

त्यांच्या गंभीर आरोपांना केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ते म्हणाले, नवाब मलिक यांचे दावे धक्कादायक आहेत. हे अर्धसत्य आहे. मलिका वास्तवापासून अनभिज्ञ आहेत. भारत सरकार महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने सक्रिय संपर्कात आहे. जेणेकरून रेमडिसिव्हीरचे सुरळीत पुरवठा होऊ शकेल.

Stop shameless politics; Maharashtra has highest oxygen supply, Piyush Goyal hits back after Malik’s allegations

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात