गोरखपूर मंदिरावर हल्ला करणारा धर्मांध म्हणतो, अल्लाहच्या घरी खूप अप्सरा, तिथे बायकोचे काय काम?


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : गोरखपूर मंदिरात हल्ला करणारा तरुण हा अत्यंत धर्मांध असल्याचे त्याच्या चौकशीत समोर आले. अल्लाहच्या घरी म्हणजे स्वर्गात खूप अप्सरा (हूर) मिळतील. तिथे बायकोचे काय काम? देवाच्या घरी जायचे तर सर्व इथेच सोडावे लागेल, असे त्याने म्हटले आहे.The fanatics who attacked the Gorakhpur temple say, “There are many Hoors in the house of Allah, what is the use of wife there?”

धर्मांधांच्या नादी लागून मुर्तझा हा तरुण मल्टिनॅश्नल कंपनीतील नोकरी सोडून गोरखपूरला आला. त्यानंतर कुटूंब व समाजाशी कोणताही संबंध येऊ नये यासाठी स्वत:ला खोलीत कोंडून घेतले होते. याविषयी तो म्हणतो, अल्लाहच्या घरी केवळ अल्लाहलाच ऐका…अल्लाहच्या मागार्ने चला, त्यानंतर निश्चितच स्वर्ग मिळेल.

मुर्तझाला त्याच्या कृत्यापासून वाचविण्यासाठी त्याचे वडील त्याला मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, एटीएसला तो अत्यंत धूर्त असल्याचा संशय आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आता या प्रकरणी आयआयटी मुंबईतून केमिकल इंजिनिअरिंग करणाºया मुर्तझाची चौकशी करणार आहे.



एटीएसच्या चौकशीत मुर्तझाने आतापर्यंत दिलेल्या सर्वच प्रश्नांचा आढावा घेतला असता तो खोटे बोलत नसल्याचे वाटते. त्यामुळे एटीएसला याविषयी ठोस निष्कर्ष काढण्यात वेळ लागत आहे.मुर्तझाचे वडील व सुप्रसिद्ध डॉक्टर के.ए. अब्बासी यांना चौकशी व जबाब नोंदवण्यासाठी एटीएसने लखनऊला बोलावले होते. पण, त्यांनी एका इमेलद्वारे वृद्धत्वामुळे आपण तिथे हजर राहू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

त्यांनी या प्रकरणी सीआरपीसी कलम-160 चा दाखला देत आपले वय 60 वर्षांहून जास्त असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ते गोरखपूर स्थिती एटीएसच्या कार्यालयात गेले. पण, संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्यामुळे अद्याप त्यांचा जबाब नोंदवता आला नाही.

याचा प्रयत्न

दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार आता पीजीआय व केजीएमयू सारख्या संस्थेच्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पॅनलकडून मुर्तझाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीनंतर या प्रकरणाची पाळेमुळे स्पष्ट होतील. सध्या अधिकारी मुर्तझाचे बँक खाती गोठवून त्याचे सर्वच ट्रान्झॅक्शन तपासत आहेत.

मुर्तझाच्या बँक व्यवहाराचा तपशील उजेडात आला आहे. त्यात सुरक्षा यंत्रणांच्या हाती गतवर्षी जून महिन्यात मुर्तझाने क्रेडिट कार्डच्या मदतीने केलेले काही संशयास्पद व्यवहार हाती लागलेत. त्यावरुन मुर्तझा पे-पालच्या माध्यमातून परदेशांतील अनेक इस्लामिक संस्थांना पैसे पाठवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जून 2021 मध्ये क्रेडिट कार्डवरुन व्यवहार केले. यात त्याने इस्लामी संस्थांना 22 हजार, 700 रु. 16,594, 16,622 व 22,907 रुपये पाठवल्याचे निष्पन्न झाले. त्याने मागील 4 ते 5 महिन्यांत शमीउल्लाह नामक व्यक्तीच्या खात्यातही अनेकदा हजारो रुपये पाठवले.

मुर्तझाचे पैसे आयसीआयसीआय, फेडरल व एचडीएफसी बँकेच्या 3 खात्यांत होते. त्याच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे एक क्रेडित कार्डही होते. एवढेच नाही तरो सीरियातील एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अनेकदा त्याने आपल्या महिला मित्राला ऑनलाईन पैसे पाठवले व ऑनलाईनच्या माध्यमातून जिहादची शपथ घेतली.

एटीएसने महाराजगंजमधून त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. नेपाळमधून परतल्यानंतर मुर्तझा या व्यक्तीला भेटला होता. त्यामुळे मुर्तझाचे संपूर्ण नेटवर्क व त्याचे परदेशी कनेक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी आता या प्रकरणाचा तपास एनआयए आपल्या हाती घेण्याची शक्यता आहे. पण, अद्याप त्याची पुष्टी झाली नाही.

The fanatics who attacked the Gorakhpur temple say, “There are many Hoors in the house of Allah, what is the use of wife there?”

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात