UP Election : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात गोरखपूरमधून लढणार भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझाद


भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी गोरखपूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या जागेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक रिंगणात आहेत. UP Election Bhim Army Chief Chandrasekhar Azad to fight against Chief Minister Yogi Adityanath from Gorakhpur


वृत्तसंस्था

लखनऊ : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी गोरखपूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या जागेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक रिंगणात आहेत.

योगी आदित्यनाथदेखील पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. 2017 मध्ये मुख्यमंत्री होईपर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते. योगी 1998 मध्ये पहिल्यांदा गोरखपूरमधून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी गोरखपूरमधून सलग ५ वेळा लोकसभा निवडणूक जिंकली. मात्र, मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला.

प्रगतीशील समाजवादी पक्षाचे (पीएसपी) राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल सिंह यादव, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओम प्रकाश राजभर, राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी आणि स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासह काही उमेदवारांपुढे आमच्या पक्षाचा उमेदवार उभा करणार नाही, असेही आझाद म्हणाले. अखिलेश यादव यांनी निवडणूक लढवल्यास पक्ष त्यांच्यासमोर उमेदवार उभा करणार नाही, असेही ते म्हणाले.

आझाद समाज पक्षाचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी मंगळवारी सांगितले होते की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने 100 जागा दिल्या तरी मी त्यांच्याशी युती करणार नाही. आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी ग्रेटर नोएडा येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशात एकट्याने निवडणूक लढवणार असून समाजवादी पक्षाशी चर्चा न झाल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

UP Election Bhim Army Chief Chandrasekhar Azad to fight against Chief Minister Yogi Adityanath from Gorakhpur

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!