सिल्वर ओक वरील दगड – चप्पल फेक; १०९ एसटी कामगारांना नोकरी गमावण्याची “शिक्षा”!!


प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक . वर दगड आणि चप्पल फेकीची शिक्षा 109 कामगारांना मिळणार आहे. या प्रकरणात १०९ कामगारांना अटक केली आहे. त्यांना १४ दिवसांची न्यायालायीन कोठडी सुनावण्यात आली आहे. नियमानुसार सरकारी अधिकारी किंवा कामगार कोणत्याही फौजदारी गुन्ह्याखाली २४ तासांच्या वर कारागृहात राहिला, तर त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाते, या नियमानुसार या १०९ कामगारांनाही नोकरी गमवावी लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत.Stone on silver oak – sandal throw; “Punishment” for 109 ST workers losing their jobs

शरद पवार यांच्या निवासस्थानावर ज्या एसटी कामगारांनी हल्ला केला होता, त्यांच्यावर सरकारने कारवाई करण्याचे ठरवले असून त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाणार नसल्याचे मंत्री परबांनी सांगितले. सोमवारी, ११ एप्रिल रोजी एसटी महामंडळाची बैठक होणार त्यात याची घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.कंत्राटी भरती करणार 

शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही. तर इतर कर्मचारी 22 तारखेपर्यंत कामगार कामावर आले नाहीत, तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का याचाही विचार केला जाणार आहे. ५ महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस अगाराने पूर्ण बसेसची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची माहितीही मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

कायदेशीर प्रक्रिया लवकरच सुरु करणार 

संतप्त एसटी कामगारांनी थेट शरद पवारांच्या घरावर दगडफेक केली. त्यावेळी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या १०९ एसटी कामगारांना अटक केली, त्यांच्यावर पोलिसांनी सविस्तर चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्याच बरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने १०९ कामगारांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

त्यामुळे सध्या हे कामगार तुरुंगात आहेत. कोणत्याही सरकारी कामगार किंवा अधिकारी २४ तास फौजदारी गुन्ह्याखाली कारागृहात राहिला तर त्याला नियमानुसार नोकरीवरून काढले जाते, या निकषानुसार आता या सर्व कामगारांना कायमची नोकरी गमवावी लागणार, हे स्पष्ट झाले आहे. याबाबतची कागदोपत्री प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Stone on silver oak – sandal throw; “Punishment” for 109 ST workers losing their jobs

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण