राम नवमी – चैत्री नवरात्री निमित्त योगी आदित्यनाथांचे गोरखपुर मध्ये कन्या पूजन!!


वृत्तसंस्था

गोरखपुर : श्रीराम नवमी आणि चैत्री नवरात्री निमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपुर मध्ये गोरक्षनाथ मंदिरात आज नऊ कन्यांचे विधीवत पूजन केले. मंदिरात त्यासाठी विशेष पूजा अर्चनाचे आयोजन करण्यात आले होते. योगी आदित्यनाथ यांनी कन्या पूजना बरोबरच राज्यातील कन्यांना मंदिरात प्रसाद भोजन ग्रहण करवले. Ram Navami – Kanya Pujan of Yogi Adityanath in Gorakhpur on the occasion of Chaitri Navratri

उत्तर प्रदेश सरकार महिला सुरक्षा आणि कन्या सुरक्षा यासाठी कटिबद्ध आहे. त्याच बरोबर महिला कल्याण आणि कन्या कल्याण यांच्या अनेक योजना या पुढील काळात देखील राबविण्यात येतील, अशी ग्वाही योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.

निर्बंधमुक्त वातावरणात भव्य आयोजन

रामनवमीनिमित्त गोरक्षनाथ मंदिरात भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात गोरखपुर सह उत्तर प्रदेशातील लाखो भाविकांनी सहभाग घेतला. कोरोना नंतरच्या काळात निर्बंध मुक्त वातावरणात प्रथमच रामनवमीच्या विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन होताना दिसत आहे.

अयोध्येत देखील 5 लाख भाविकांनी श्रीराम जन्मभूमि येथे मोठ्या उत्साहात राम जन्म सोहळा भव्य प्रमाणात साजरा केला. तशाच प्रकारचे आयोजन गोरखपुर मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत गोरक्षनाथ मंदिरात करण्यात आले.

Ram Navami – Kanya Pujan of Yogi Adityanath in Gorakhpur on the occasion of Chaitri Navratri

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात