दिल्लीतील करोनाची साथ पूर्ण आटोक्यात, एक सप्टेंबरपासून शाळा होणार सुरु

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱया लाटेची परिस्थिती आटोक्यात आल्याचे दिसत असून मागील २४ तासांत दिल्लीत फक्त २० नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे दिल्लीतील उच्च माध्यमिक शाळा येत्या १ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, कोचिंग क्लास आदींना परवानगी देण्यात आली आहे. schools will opened in delhi

राजधानीतील शाळा- महाविद्यालये जवळपास सहा महिन्यांच्या खंडानंतर पूर्ववत सुरू करताना दिल्ली सरकारने कडक नियमावली जारी केली आहे. एका वर्गात ile न करणे आदी नियम जारी करण्यात आले आहेत.



मुलांनी वह्यापुस्तके, पेन, पेन्सिल, डबा आदींची देवाणघेवाण इतर मुलांबरोबर करू नये, असा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची लेखी परवानगी आवश्यक आहे. शाळा नियमांचे पालन करतात का हे पाहण्यासाठी राज्य सरकारने सतर्कता पथके तयार केली आहेत. नियमांचे उल्लंघन होत असेल त्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

schools will opened in delhi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात