उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना धक्का? पुरुषोत्तम जगताप भाजपच्या संपर्कात?

Purushottam Jagtap

विशेष प्रतिनिधी

बारामती : दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये सहकार क्षेत्रात होत असलेली सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची पहिलीच निवडणूक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारी ठरत आहे. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशीच विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि भाजपचे नेते व पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी एकाच वेळी व एकाच ठिकाणी बुधवारी (३० सप्टेंबर) सभासदांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे पुरुषोत्तम जगताप भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चेला सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात उधाण आले आहे.



पुरुषोत्तम जगताप गेली बारा वर्षे कारखान्याचे अध्यक्ष आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या कारभाराला राजकीय पाठबळ मिळत असताना जगताप हे कारखाना व्यवस्थापनातील प्रमुख चेहरा राहिले. त्यामुळे अजितदादांच्या निधनानंतर पहिली निवडणूक सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवून राष्ट्रवादीची कारखान्यावरील तसेच पक्ष संघटनेतील पकड कायम ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात होती. यापूर्वीच भाजपने सोमेश्वरमध्ये स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली होती.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत वादाचा फायदा उठवत भाजपने पडद्यामागून हालचाली केल्याचे मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम जगताप आणि भाजपचे संजय जगताप एकाच व्यासपीठावर सभासदांशी संवाद साधणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे. भाजपने पडद्यामागून जगताप यांना आपल्या बाजूला वळविण्याच्या हालचाली केल्याची चर्चा असली, तरी पुरुषोत्तम जगताप यांनी अद्याप भाजपमध्ये जाण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

मात्र, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची पहिलीच सहकारातील मोठी परीक्षा सुरू असताना मित्रपक्षाकडूनच स्थानिक समीकरणे बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याने राष्ट्रवादीसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. आजच्या मेळाव्यात पुरुषोत्तम जगताप नेमकी कोणती भूमिका घेतात, यावर सोमेश्वरच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे.

Is Purushottam Jagtap in contact with the BJP?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात