प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू मध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या श्रीराम मंदिराचे लोकार्पण सध्या होत आहे त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. मोदी यांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवून स्वागताचा स्वीकार केला. आता सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तिघांच्या एकत्र फोटोची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. Prime Minister Modi’s welcome from Ajit pawar Fadnavis
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यातील लोहगाव विमानतळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. या तिघांना एकत्र फोटो निकाल निघाला आहे. या फोटोची चर्चा महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया मध्ये सुरू आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुणे पहुंचे। प्रधानमंत्री का स्वागत महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार, एलओपी देवेंद्र फडणवीस ने किया: पीएमओ pic.twitter.com/YYRedyDnGK — ANI_HindiNews (@AHindinews) June 14, 2022
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुणे पहुंचे। प्रधानमंत्री का स्वागत महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजीत पवार, एलओपी देवेंद्र फडणवीस ने किया: पीएमओ pic.twitter.com/YYRedyDnGK
— ANI_HindiNews (@AHindinews) June 14, 2022
– 400 वारकऱ्यांसोबत लोकार्पण सोहळा
नरेंद्र मोदी हे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत हेलिकॉप्टरने देहूत आले. यासाठी झेंडे मळा येथे 3 हेलिपॅड तयार करण्यात आले. येथे 400 वारकऱ्यांसमवेत लोकार्पण सोहळा होत आहे. या सोहळ्यानंतर पुन्हा मोटारीने सभास्थानी येतील. येथे 22 एकरात मंडप उभारण्यात आला आहे. मध्यभागी दोन मोठे मंडप, स्टेज असून डावी आणि उजवीकडे दोन लहान मंडप टाकण्यात आले आहेत.
मोदी-उद्धव ठाकरे एकाच मंचावर
देहूतील कार्यक्रम झाल्यानंतर नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत. यावेळी राजभवनातील क्रांतिकारी गॅलरीचे उद्धाटन मोदींच्या हस्ते होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मोदी आणि उद्धव ठाकरे आज एकाच मंचावर दिसणार आहेत.
Special moments from Pune… pic.twitter.com/hdqdTQO0cx — PMO India (@PMOIndia) June 14, 2022
Special moments from Pune… pic.twitter.com/hdqdTQO0cx
— PMO India (@PMOIndia) June 14, 2022
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App