नीरज चोप्रावर बक्षिसांचा वर्षाव; ६ कोटींचे रोख बक्षीस; हरियाणाचा क्रीडा प्रमुख होण्याचीही ऑफर!!


वृत्तसंस्था

चंडीगड : नीरज चोप्रा याने भालाफेकीत टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. या नंतर त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव सुरू झाला आहे/ हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नाट्यमय अंदाजात, “हरियाणा के छोरे ने लठ गाड दिया है, और लठ तो क्या भालेवाला लठ गाड़ दिया है,” असे म्हणत नीरजला एक बडी ऑफर दिली आहे. Neeraj Chopra has proven that when there is the will, there is a way. He has made the Armed Forces

पंचकुलामध्ये हरियाणा सरकार ऍथलेटिक्ससाठी एक्सलन्स सेंटर उभारत आहे. त्याचे प्रमुख पद हरियाणा सरकार नीरज चोप्रा यांना देईल. त्याने ते स्वीकारावे, असे मनोहर लाल खट्टर यांनी जाहीर केले आहे. Neeraj Chopra has proven that when there is the will, there is a way. He has made the Armed Forces

नीरज चोप्राला सहा कोटी रुपयांचे बक्षीस, क्लास वन सरकारी नोकरी आणि त्याला हव्या त्या शहरात हवा तो प्लॉट पन्नास टक्के सवलतीने दिला जाईल, असेही मनोहर लाल खट्टर यांनी जाहीर केले आहे. ऑलिम्पिक खेळाडूंना असे भरीव प्रोत्साहन देण्याचे हरियाणा सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



भारताच्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी देखील नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले असून “जिथे इच्छा तिथे मार्ग”, हे वचन त्याने सिद्ध केले आहे, असे म्हटले आहे. भारतीय सैन्य दलाला आणि देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी त्याने केलेली आहे. भारताच्या सर्व ऑलिम्पियन खेळाडूंनी भारताची मान संपूर्ण जगात उंचावली आहे. भारतीय सैन्य दलाला या खेळाडूंचा अभिमान वाटतो, अशा भावना जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केल्या आहेत.

Neeraj Chopra has proven that when there is the will, there is a way. He has made the Armed Forces

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात