संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू ; ओम बिर्ला यांची माहिती; १३ ऑगस्टपर्यंत सुरु


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनास १९ जुलैपासून सुरूवात होत आहे. ते १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामुळे १९ कामकाजाचे दिवस असतील, अशी माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.Monsoon session of Parliament will take place from July 19Web Title: The Monsoon Session Of Parliament Will Take Place From July 19 to 13 August : Om Birla

संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात, सरकार अनेक बिलं सादर करु शकते. या दरम्यान, कोरोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला आहे का ? , हे तपासल जाणार आहे.

Monsoon session of Parliament will take place from July 19Web Title: The Monsoon Session Of Parliament Will Take Place From July 19 to 13 August : Om Birla

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण