जम्मू-काश्मीर परिसीमन आयोगाची बैठक, प्रस्तावानुसार विधानसभेच्या 7 जागा वाढणार; पाकव्यात काश्मिरासाठी 24 जागा राखीव

Jammu and Kashmir Delimitation Commission meeting, proposal to increase 7 seats in the Assembly; 24 seats reserved for Kashmir in Pakistan

Jammu and Kashmir Delimitation Commission : जम्मू-काश्मीरसाठी सीमांकन आयोगाने जम्मूमध्ये विधानसभेच्या 6 आणि काश्मीर खोऱ्यात 1 ने जागा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ जागा होतील. यामध्ये एसटीसाठी 9 आणि एससीसाठी 7 जागा राखीव असतील. त्याच वेळी पीओकेसाठी 24 जागा राखीव असतील. Jammu and Kashmir Delimitation Commission meeting, proposal to increase 7 seats in the Assembly; 24 seats reserved for Kashmir in Pakistan


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरसाठी सीमांकन आयोगाने जम्मूमध्ये विधानसभेच्या 6 आणि काश्मीर खोऱ्यात 1 ने जागा वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे जम्मूमध्ये ४३ आणि काश्मीरमध्ये ४७ जागा होतील. यामध्ये एसटीसाठी 9 आणि एससीसाठी 7 जागा राखीव असतील. त्याच वेळी पीओकेसाठी 24 जागा राखीव असतील.

अशा प्रकारे, जम्मू-काश्मीर विधानसभेच्या विद्यमान 83 जागा वाढवून 90 करण्याचा प्रस्ताव आहे. आयोगाने याबाबत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत सूचना मागवल्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच अनुसूचित जातींना (SC) निवडणूक आरक्षण दिले जाणार आहे.

सीमांकन आयोगाच्या सूचनेवर पीडीपी अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी जोरदार टीका केली आहे. जनगणनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे ट्विट त्यांनी केले. एका क्षेत्रासाठी 6 जागा आणि काश्मीरसाठी फक्त एक जागा प्रस्तावित करून लोकांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे, पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद गनी लोन यांनी ट्विट केले की, आयोगाच्या शिफारशी पूर्णपणे अवैध असून त्या पूर्वग्रहदूषित आहेत.

सीमांकन आयोगाची बैठक सोमवारी दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये झाली. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, भाजपचे केंद्र सरकारचे मंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली. फारुख यांच्यासह त्यांच्या पक्षाचे खासदार हसनैन मसूदीही या बैठकीला उपस्थित होते. आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई, मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि जम्मू-काश्मीरचे निवडणूक आयुक्त केके शर्मा यांच्यासह सर्वजण बैठकीत सहभागी झाले होते.

Jammu and Kashmir Delimitation Commission meeting, proposal to increase 7 seats in the Assembly; 24 seats reserved for Kashmir in Pakistan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात