कट्टरतावादी PFI वरील कारवाईचे केरळमध्ये हिंसक पडसाद, पण उत्तरेतील मुस्लिम संघटनांकडून कारवाईचे स्वागत


वृत्तसंस्था

लखनौ : कट्टरतावादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI वरील छापेमारीच्या कायदेशीर कारवाईनंतर केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसक पडसाद उमटले असले तरी उत्तरेतील मुस्लिम संघटनांनी या कायदेशीर कारवाईचे स्वागत केले आहे. especially muslim youth to be patient through raids being done against PFI as this is being done to stop terrorist activities in country

काल 22 सप्टेंबर 2022 रोजी देशभरातील 15 राज्यांमध्ये 96 ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्था एनआयए आणि सक्तवसुली संचनालय ईडी आणि विविध राज्यांच्या पोलिसांच्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम्स अर्थात एसआयटी यांनी एकत्रितपणे छापेमारी करून पीएफआयच्या 106 म्होरक्यांना अटक केली. संपूर्ण देशभरात या यशस्वी कारवाईचे स्वागत झाले. उत्तरेतील मुस्लिम संघटनांनी देखील पीएफआय सारख्या कट्टरतावादी संघटनेवर झालेल्या कायदेशीर कारवाईचे स्वागत केले.

पण केरळमध्ये मात्र पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी हिंसाचार माजवून विविध शहरांमध्ये बस, रिक्षा, टॅक्सी, फोडल्या आहेत. पीएफआय संघटनेने आज बेकायदेशीर रित्या बंद देखील पुकारला आहे. या बंद दरम्यानच संघटनेच्या म्होरक्यांनी हिंसाचार माजवला आहे.

मुस्लिम संघटनांकडून कारवाईचे स्वागत

लखनऊ मध्ये मुख्यालय असलेल्या ऑल इंडिया पसमांदा मुस्लिम महाज या संघटनेने पीएफआय वरील कारवाईचे स्वागत केले आहे. एनआयए सारख्या राष्ट्रीय तपास संस्थेने केलेली कारवाई ही दहशतवादाच्या विरोधात आणि कट्टरता वादाच्या विरोधात आहे. पीएफआय संघटना अनेक घातपाती कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल आम्ही देखील त्या संघटनेचा निषेध करून त्यावर बंदी आणण्याची मागणी केली होती. आता कायदेशीर कारवाई झाली आहे. तिचे स्वागत करतो, असे पत्रक ऑल इंडिया पसमांदा मुस्लिम महाज या संघटनेने काढले आहे.

त्याचबरोबर ऑल इंडिया सुफी सजदानशीन कौन्सिलने देखील देशातल्या मुस्लिमांना शांतता पाळण्याचे आवाहन केले आहे. देशात दहशतवाद विरोधी कारवाई सुरू असताना पीएफआय सारख्या संघटने विरुद्ध काही पुरावे असतील म्हणूनच छाप्यांसारखी कायदेशीर कारवाई केली आहे. याचे पुरावे आणि सत्य लवकरच बाहेर येतील. अशावेळी देशभरातील नागरिकांनी, विशेषतः मुस्लिम युवकांनी शांतता आणि संयम बाळगावा, असे आवाहन सय्यद नसरुद्दीन चिश्ती यांनी केले आहे.

especially muslim youth to be patient through raids being done against PFI as this is being done to stop terrorist activities in country

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात