NIA छापे : कट्टरतावादी संघटना “ऑपरेशन PFI” यशस्वी झाले कसे??; रहस्य काय??, पुढे होणार काय??


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : 22 सप्टेंबर 2022 रोजी “ऑपरेशन PFI” यशस्वी कसे झाले?? त्याचे रहस्य काय?? आणि पुढे होणार काय??, याचा उलगडा सरकारी सूत्रांनी केला आहे. जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवण्यापूर्वी जो “गृहपाठ” केंद्रीय गृह मंत्रालयाने केला होता, तसाच “गृहपाठ” PFI विरुद्ध राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA आणि सक्तवसुली संचालनालय अर्थात ED यांनी छापेमारी करण्यापूर्वी केला असल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.How the massive crackdown against PFI was planned

मूळात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया PFI ही कट्टरतावादी संघटना कशाप्रकारे संपूर्ण देशभरात ऑपरेट करते??, देशभरातल्या कोणकोणत्या घातपाती कृत्यांमध्ये या संघटनेचे म्होरके सामील झाले??, वेगवेगळ्या नावांनी हीच संघटना वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशा पद्धतीने कार्यरत आहे??, याची तपशीलवार आणि बारकाईची माहिती गेल्या 3 वर्षांपासून सरकारी पातळीवर गुप्तपणे गोळा होत आहे. इतकेच नाही तर PFI चे फंडिंग येते कुठून??, याचीही तपशीलवार माहिती गोळा करून तिचे एनालिसिस गेले 3 – 4 महिने सुरू होते. निवडक अरब देशांमधून PFI शी संबंधित सुमारे 3 लाख बँक खात्यांमध्ये काही हजार कोटी रुपये जमा झाल्याची माहिती गुप्तचरांनी दिली आहे. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. केंद्रीय तपास संस्था NIA आणि ED यामधील वरिष्ठ अधिकारी याच्या तपास कामात गुंतले आहेत.



केंद्रीय गृह मंत्रालयातील आणि अन्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी विविध राज्यांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गेल्या काही महिन्यांपासून संपर्कात होते. कोणत्याही स्थितीत कुठलीही माहिती “लिक” होता कामा नये, याची पूर्ण काळजी केंद्रीय तपास संस्था घेत असल्याचेच स्पष्ट झाले आहे. कारण PFI विरोधातील छापेमारीची कारवाई 22 सप्टेंबर 2022 रोजी एकाच दिवशी 11 राज्यांमध्ये 96 ठिकाणी करून 106 म्होरके ताब्यात घेतले आहेत. कोणालाही पळून जाण्याची अथवा परागंदा होण्याची संधीही उपलब्ध करून दिली गेली नाही, हे या कारवाईचे महत्त्वाचे यश आहे!!

जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविण्यापूर्वी जो “गृहपाठ” केंद्रीय गृह मंत्रालयाने केला होता तसाच “गृहपाठ” PFI सारख्या कट्टरतावादी संघटने विरुद्ध एकाच दिवशी कायद्याचा वरवंटा फिरवताना केला होता!!

– अजित डोवालांची कामगिरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या दिवशी केरळच्या कोचीमध्ये विक्रांत विमानवाहू युद्धनौकेचे अनावरण करण्यासाठी गेले होते, त्याच दिवशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तिथल्या पोलीस प्रमुखांना भेटले होते. सर्व यंत्रणांना अलर्ट राहायला सांगितले होते. त्याचा परिणाम म्हणून केरळमध्ये सर्वाधिक 22 ठिकाणी छापेमारी करून 22 म्होरक्यांना ताब्यात घेतले आहे.

केरळ मधले “मिशन” आटोपल्यानंतर अजित डोवाल 3 दिवस मुंबईत राजभवनात राहिले होते. ते राजभवनात राहिले असल्याच्या बातम्याही त्यावेळी आल्या होत्या. राजभवनात त्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या खास बैठका घेऊन त्यांना कारवाईच्या दृष्टीने अलर्ट राहायला सांगितले होते. महाराष्ट्रात देखील पुणे मुंबई नवी मुंबई मालेगाव भिवंडी आदी ठिकाणी छापेमारी करून 20 जणांना अटक केली आहे.

11 राज्यांमध्ये 96 ठिकाणी छापेमारी करून PFI कट्टरतावादी संघटनेच्या 106 म्होरक्यांना ताब्यात घेतले हे या कारवाईचे यश आहे. या सर्वांना कोर्टात पेश केले आहे. या सगळ्यांची चौकशी आणि तपास करून जी नावे बाहेर येतील आणि जे टेरर फंडिंग मोड्यूल उघड होईल त्यावर पुढची कारवाई होणार आहे.

How the massive crackdown against PFI was planned

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात