दलाई लामा : चीनमध्ये नव्हे, तर भारतीय लोकशाहीच्या मोकळ्या मरण पत्करायला आवडेल


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी आपल्या मृत्यू संदर्भात एक वेगळे वक्तव्य केले आहे. त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटले आहेत. Dalai Lama: Would like to die free of Indian democracy, not in China

मला चीनमध्ये नव्हे, तर भारतातल्या लोकशाहीच्या मोकळ्या वातावरणात मरण पत्करायला आवडेल, असे त्यांनी म्हटले आहे. दलाई लामा 1950 च्या दशकापासून भारतात वास्तव्य करून आहेत. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीशी त्यांचा जुना राजकीय संघर्ष आहे.

चीनमधील कम्युनिस्ट राजवटीने तिबेट बेकायदेशीररीत्या बळकावल्यानंतर दलाई लामा यांनी तिबेटची राजधानी ल्हासा येथून बाहेर पडून ते गुप्तपणे भारतात येऊन दाखल झाले, तेव्हापासून ते तिबेटी जनतेच्या लोकशाही हक्कासाठी संघर्षरत राहून भारतातूनच जागतिक मंचावर आवाज उठवत आहेत.

दलाई लामा हे आता वयाच्या नव्वदीत आहेत. त्यांनी आपल्या मृत्यू विषयी वर उल्लेख केलेले वक्तव्य केले आहे. भारतात मला आपल्या लोकांमध्ये वावरत असल्याचे जाणवते. इथे निर्व्याज प्रेम मिळते. कुठलीही कृत्रिमता इथे नाही.

पण चीनमध्ये सगळीच कृत्रिमता आहे. चिनी अधिकाऱ्यांच्या गराड्यात राहून मरण पत्करण्यापेक्षा मला भारतात राहून लोकशाहीच्या मोकळ्या वातावरणात मरण पत्करणे आवडेल, असे ते म्हणाले आहेत.

Dalai Lama: Would like to die free of Indian democracy, not in China

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती