प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज राजधानी दिल्लीत अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली. दिल्लीतील कस्तुरबा मार्गावरील एका मशिदीत दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.That is the statement of Umar Ahmed Ilyasi after his meeting with Father of the Nation, Mohan Bhagwat
यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संपर्क आणि चर्चेच्या सामान्य प्रक्रियेनुसार भेट झाल्याचे स्पष्ट केले. परंतु, इमाम उमर अहमद इलियासी यांनी मात्र डॉ. भागवत यांच्या भेटीनंतर एक वेगळे विधान केले. “ते” राष्ट्रपिता आहेत. ते बोलले म्हणजे ते योग्यच असेल. राष्ट्र सर्वप्रथम आपण सगळ्यांनी स्वीकारलेच आहे, असे वक्तव्य उमर अहमद इलियासी यांनी केले आहे.
भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुसलमानांचा डीएनए एक आहे, असे वक्तव्य डॉ. मोहन भागवत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता, उमर अहमद इलियासी यांनी डॉ. मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत. ते जे बोलले असतील ते योग्यच असेल, राष्ट्र सर्वप्रथम हे तत्व आपण सर्वांनी स्वीकारलेच आहे, असे मत एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केले आहे.
डॉ. मोहन भागवत आणि उमर अहमद इलियासी यांच्याशी आज झालेली भेट ही संघाची सर्वसामान्य संपर्क आणि चर्चेची प्रक्रिया असते तशी घडल्याचे संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे.
Mohan Bhagwat @71: त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् शुभामाशिषं देहि तत्पूर्तये। सर्वस्व मातृभूमिसाठी…राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत – बहुआयामी व्यक्तिमत्व
इमाम उमर अहमद इलियासी अनेक दिवसांपूर्वी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना निमंत्रण दिले होते त्यानुसार आज दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. त्या भेटीच्या वेळी संघाचे वरिष्ठ नेते कृष्णकुमार रामलाल आणि इंद्रेश कुमार हे देखील उपस्थित होते.
या भेटीनंतर इमाम उमर अहमद इलियासी यांनी जे वक्तव्य केले आहे, त्यावरून सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
मुस्लिम बुद्धिजीवींशी चर्चा
डॉ. मोहन भागवत हे देशात सांप्रदायिक सदभाव टिकून राहावा यासाठी अनेक संप्रदायांच्या नेत्यांशी आवर्जून चर्चा करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते मुस्लिम बुद्धिजीवींशी चर्चा करत आहेत. इमाम उमर अहमद इलियासी यांच्याशी आज केलेली चर्चा हा अशाच स्वरूपाच्या भेटीगाठींचा एक भाग आहे. यापूर्वी डॉ. मोहन भागवत यांनी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी, माजी कुलपती जमीर उद्दीन शाह, दिल्लीचे माजी उपराज्यपाल नजीब जंग, राष्ट्रीय लोक दलाचे नेते शाहीर सिद्दीकी आणि व्यावसायिक सईद शेरवानी यांची एक बैठक घेतली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App