वृत्तसंस्था
मथुरा : आज देशभरात जन्माष्टमीची धूमधाम असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याच संधीचा वापर करून आपल्या विरोधकांचा समाचार घेतला आहे. मथुरेत जन्माष्टमीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी राम मंदिर आणि कृष्ण मंदिराच्या विरोधात काम करणाऱ्यांची पोलखोल केली आहे. due to their fear of being labelled as communal, are now saying Ram is mine, Krishna is also mine:
योगी म्हणाले की, आत्तापर्यंत अनेक जण आपल्यावर जातीयतेचा किंवा धर्मांधतेचा शिक्का बसू नये म्हणून मंदिरात जाण्याचे टाळत होते. परंतु आता देशातले वातावरण एवढे बदलले आहे की हेच नेते आता “राम माझा”, “कृष्णही माझा”, असे म्हणत फिरत आहेत. या नेत्यांनी कायमच राम मंदिराला विरोध केला. परंतु आता अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहत आहे हे पाहून त्यांना राम आठवला आहे आणि कृष्णही आठवला आहे.
Those who were earlier afraid to go to temples, due to their fear of being labelled as communal, are now saying Ram is mine, Krishna is also mine: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath in Mathura pic.twitter.com/6lshNQuXX1 — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 30, 2021
Those who were earlier afraid to go to temples, due to their fear of being labelled as communal, are now saying Ram is mine, Krishna is also mine: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath in Mathura pic.twitter.com/6lshNQuXX1
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) August 30, 2021
काही महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी आपण सहकुटुंब सहपरिवार अयोध्येत जाऊन राम लल्ला यांची पूजा करणार असल्याचे जाहीर केले होते. येत्या सहा – आठ महिन्यांत उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाने ब्राह्मण मतांच्या लांगुलचालन यासाठी संपूर्ण राज्यभर भगवान परशुराम यांचे पुतळे उभे करण्याचा सपाटा लावला आहे. समाजवादी पक्षाच्या ब्राह्मण नेत्यांनी आणि आमदारांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. बहुजन समाज पक्षाची ब्राह्मण संमेलने देखील जोरात होत आहेत. त्या संमेलनांमध्ये देखील भगवान परशुरामांची महिमा मंडण होते आहे.
या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांवर तसेच काँग्रेसच्याही नेत्यांवर आज टीकास्त्र सोडून घेतले. प्रियांका गांधी यांनी मध्यंतरी हनुमान गढी येथे जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले होते. त्यावरही योगी आदित्यनाथ यांनी कटाक्ष टाकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App