मारुती सुझुकीच्या कार सप्टेंबरपासून महागणार, वर्षातील सलग तिसरी वाढ; अनेक पार्टच्या किमती वाढल्याने घेतला निर्णय


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी सप्टेंबरपासून कारच्या किमती वाढविणार आहे. त्यामुळे ग्राहकांना या कंपनीच्या कार वाढीव किमतीत खरेदी कराव्या लागणार आहेत.Maruti Suzuki cars to become more expensive from September ,Third time in a year ; The decision was taken due to rising prices of many parts

कंपनीकडून सलग तिसऱ्यांदा कारच्या किंमती वाढविल्या जात आहेत. यापूर्वी जानेवारीत वाढ केली होती. अल्टो ते विटारा ब्रीझा अशा सर्व मॉडेलच्या किमती सप्टेंबरपासून वाढणार असल्याची माहिती कंपनीतील सूत्रांनी दिली. या पार्श्वभूमीवर सध्या कंपनीकडून काही ऑफर्स दिल्या जात आहेत.



गेल्या वर्षापासून कारसाठी लागणाऱ्या पार्टच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे जुन्या दरात कार देणे कंपनीला परवडत नाही त्यामुळे आम्ही पुढील महिन्यात कारच्या सर्व मॉडेलच्या किमती वाढवत आहोत. या किमती सप्टेंबरपासून लागू होतील.

जानेवारीमध्ये कंपनीने काही मॉडेलच्या किमती ३४ हजार रुपयांनी वाढविल्या आहेत. एप्रिलमध्ये दुसऱ्यांदा किमती वाढवल्या गेल्या. ही वाढ १.९ टक्क्यांनी अधिक होती.कारच्या किमती वाढविणारी मारुती सुझुकी ही भारतातील एकमेव कंपनी नाही.

कोरोना काळात अनेक आटोमोबाईल कंपन्या गेल्या वर्षी मार्चमध्ये कमी मागणी आणि उत्पादन जास्त झाल्याने अडचणीत आल्या. त्यावर तोटा भरून काढण्यासाठी काही कंपन्यांनी यंदा वाहनांच्या किमतीत वाढ केली.

महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने सुद्धा आपल्या मॉडेलच्या किमतीत गेल्या वर्षात तीनदा वाढ केली. जवळजवळ कारच्या किमती या १ लाखांनी वाढविल्या होत्या. जानेवारी, मे आणि जुलैमध्ये किमती वाढविल्या होत्या.टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात कारच्या किमती वाढविल्या होत्या. ही वाढ ८ टक्के होती. मे महिन्यात किमती वाढविल्या. काही मॉडेलमध्ये ३६ हजार रुपयांपर्यंत वाढ केली होती.

Maruti Suzuki cars to become more expensive from September ,Third time in a year ; The decision was taken due to rising prices of many parts

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात