मारुती सुझुकी उद्योग समुहाला ठोठावला २०० कोटी रुपयांचा दंड, भारतीय स्पर्धा आयोगाने केली कारवाई


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी उद्योग समुहाला भारतीय स्पर्धा आयोगाने तब्बल २०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. भारतीय स्पर्धा आयोग ही देशाची अविश्वास नियामक असून कंपन्यांतील निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देण्याचे काम करते.Maruti Suzuki fined Rs 200 crore by Competition Commission of India

भारतीय स्पर्धा आयोग कंपन्यांतील स्पर्धेत ग्राहकांचे हित जपून त्यामध्ये कोणाचेही नुकसान होणा नाही यासाठी काम करते. भारतीय स्पर्धा आयोगाने म्हटले आहे की, मारुती कंपनीने स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे त्यामुळे हा दंड करण्यात आला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाच्या म्हणण्यानुसार, मारुती उद्योग समुहाने डीलर्सवर दबाव आणून सवलती निश्चित केल्या होत्या.



2019 मध्ये मारुतीविरोधात तपास सुरू केला, ज्यात कारवर सूट देण्याबाबत आरोप करण्यात आले. मारुतीच्या दबावामुळे कार डीलर्समध्ये विक्रीसाठी स्पर्धा होती. यामुळे ग्राहकांचे नुकसान झाले कारण जर डीलर्सनी कोणत्याही दबावाशिवाय स्वत:हून किंमत आणि सूट निश्चित केली असती तर कारच्या किंमती खाली येऊ शकल्या असत्या.

भारतीय स्पर्धा आयोगाने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची चौकशी केली आणि कंपनीला अशा कामापासून दूर राहण्याचे निर्देश दिले. सीसीआयने 60 दिवसांच्या आत 200 कोटी रुपये दंड जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

मारुती सुझुकीला पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमध्ये रीसेल प्राइस मेंटेनन्सच्या नियमांतर्गत दंड ठोठावण्यात आला आहे. कार डीलरसोबत सवलत नियंत्रण धोरणात तफावत असल्याचे आढळल्यानंतर दंड आकारण्याचा निर्णय घेतला. डीलर्सना एमएसआयएलने निश्चित केलेल्या सवलतींपेक्षा जास्त ग्राहकांना सवलत देण्यास मनाई होती. म्हणजेच मारुती सुझुकीने ठरवलेला सवलतीचा दर, तोच दर डीलरने पाळायचा होता.

एमएसआयएलकडे कार डीलर्ससाठी सवलत नियंत्रण धोरण आहे, ज्या अंतर्गत डीलर्स मारुती सुझुकीने ठरवलेल्या मयार्देपेक्षा जास्त सूट देऊ शकत नाहीत. यामुळे ग्राहकांचे नुकसान झाले कारण जर डीलर्सनी त्यांच्यानुसार सूट निश्चित केली असती तर गाड्यांच्या किमती खाली येऊ शकल्या असत्या. सीसीआयने म्हटले आहे, जर एखाद्या व्यापाऱ्याला ग्राहकांना सवलत द्यायची असेल तर त्यासाठी एमएसआयएलकडून परवानगी घ्यावी लागेल.

जर एखाद्या व्यापाऱ्याने स्वत:च सवलत दिली तर त्यावर दंड आकारला जाईल आणि त्यासाठी सवलत नियंत्रण धोरणाचा हवाला देण्यात आला. केवळ डीलरविरूद्धच नव्हे तर डीलरशिप एजंट्स, डायरेक्ट सेल्स एक्झिक्युटिव्ह, रिजनल मॅनेजर, शोरूम मॅनेजर, टीम लीडर इत्यादींवरही दंड आकारण्यात येतो.

मारुती सोबत जपानी कंपनी सुझुकी मोटर कॉपोर्रेशन आहे, कंपनीची यात मोठी भागीदारी आहे. या वर्षी जूनमध्ये मारुती सुझुकीने आपल्या सर्व वाहनांच्या किमती वाढवल्या होत्या, जी जुलै-सप्टेंबर दरम्यान लागू करण्यात आली होती. कंपनीने म्हटले होते की, इनपुट कॉस्ट किंवा खर्चात मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे किंमती वाढवणे आवश्यक झाले आहे. मारुती सुझुकीने यावर्षी तीन वेळा किंमतीत वाढ केली आहे. जानेवारी, एप्रिल आणि जूनमध्ये दरवाढीची घोषणा करण्यात आली.

Maruti Suzuki fined Rs 200 crore by Competition Commission of India

विशेष प्रतिनिधी

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात