पुणें तिथे काय उणें….! नमो मंदिर पुण्यात …पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाहिल्यावर प्रेरणा मिळते ; म्हणून उभारले नमो मंदिर


पुण्यात असंख्य मंदिर आहेत. त्यात आणखी एका मंदिराची भर पडलीय. त्याचं नाव नमो मंदिर…


पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती पहिला मानाचा गणपती. दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, तिसरा गुरूजी तालीम, चौथा तुळशीबाग व पाचवा केसरी गणपती. पुण्यात किंवा देशात कुठं, कोणी, कधी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला यावर मतभिन्नता असली तरी पुण्यनगरीत ‘नमो’ मंदिराची प्रतिष्ठापना मयूर मुंडे नावाच्या कार्यकर्त्याने केली यावर कसलीही मतभिन्नता होणार नाही.


विशेष प्रतिनिधी

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Narendra Modi) कार्य आणि देशभक्ति सर्वश्रूत आहे .त्यामूळे त्यांना माननारे आणि पुजनारे देखील भरपूर आहेत.पुण्यात तर अशाच एका मोदी भक्ताने पंतप्रधान मोदींना चक्क देवाचा दर्जा देऊन त्यांचे मंदिरच (Modi Temple) उभारले आहे. अर्थात यामध्ये मोदी भक्तांना काही आश्चर्य वाटत नसले, तरी सर्वसामान्य लोकांसाठी मोदींचे मंदिर हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी आपण अनेकदा मोदी भक्त हा शब्द ऐकला आहे. मात्र, त्यामुळे पुण्यामध्ये एका मोदीभक्ताने यालाच साजेशी कृती केली आहे. पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे.What is missing in Pune ….! Namo temple in Pune … Seeing Prime Minister Narendra Modi inspires; So the Namo temple was built

पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे (Mayur Mundhe) या भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करुन घेतला आहे. याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च आलेला आहे. 15 ऑगस्ट 2021 दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे.

मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली आहे. मंदिराबाहेर असलेल्या, फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आली आहे. या मंदिरावरून मला विरोधकांनी ट्रोल केलं गेलं तरी चालेल, पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याकरिता हे मंदीर उभारले असल्याचे मयूर मुंढेनी यावेळी सांगितले आहे.

What is missing in Pune ….! Namo temple in Pune … Seeing Prime Minister Narendra Modi inspires; So the Namo temple was built

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण