Hindu rate of counter terrorism; म्हणजे काय??… धीम्या गतीवर मात कशी करायची…??


नाशिक : काहीच दिवसांपूर्वी 1990 सालचे एक कार्टून सोशल मीडियावर नजरेस पडले. भारताच्या अर्थव्यवस्थेत संदर्भातले ते कार्टून होते. त्याला नाव देण्यात आले होते Hindu rate of economic reforms. हा तो काळ होता जेव्हा पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या सरकारने देशाची दैनंदिन अर्थव्यवस्था चालवण्यासाठी सोने ब्रिटनमध्ये गहाण टाकले होते.Hindu rate of counter terrorism; how to increase it??

आपली आर्थिक हालत त्या वेळी फारच खस्ता झाली होती आत्ताच या राष्ट्र मंचाचे प्रवर्तक यशवंत सिन्हा हे त्यावेळी चंद्रशेखर यांचे सहकारी होते त्या कार्टून मध्ये चंद्रशेखर आणि यशवंत सिन्हा यांच्यावरच खोचक टिप्पणी करण्यात आली होती. त्याच्यावर त्यावेळी भरपूर अनुकूल – प्रतिकूल टीका टिपण्या झाल्या होत्या.



आत्ता ते कार्टून आठवायचे कारण दोन-तीन बातम्यांमध्ये आहे. यातली पहिली बातमी आंतरराष्ट्रीय पातळीवर 40 विद्यापीठांनी स्पॉन्सर केलेली Dismantling Global Hindutva परिषद, दुसरी बातमी तालिबानच्या अफगाणिस्तान मधल्या तालिबान राजवटीची आणि तिसरी बातमी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या एका निर्णयाची आहे. निर्णय महत्त्वाचा आहे.

उत्तर प्रदेशातल्या देवबंद मध्ये ATS कमांडोंना प्रशिक्षण देण्याचे महत्त्वाचे केंद्र ते सुरू करत आहेत. त्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. त्यांचे माहिती सल्लागार शलभ मणि त्रिपाठी यांनी तालिबान राजवटीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारच्या ATS कमांडो प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीची बातमी ट्विट केली आहे. नेमकी इथेच आजच्या विषयाची “मेख” आहे.

एकीकडे तालिबानसारख्या इस्लामी राजवटीचे राक्षसी आक्रमण वाढते आहे. दुसरीकडे हिंदुत्वाचा खोटा बागुलबुवा उभा करून त्याचा जगाला कसा धोका आहे हे सांगणाऱ्या परिषदा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे राजकीय विद्वान लिबरल विचारवंत भरवत आहेत. जगभरातल्या 45 सेंटर्सवर त्याची नोंदणी सुरु आहे. जगातल्या 40 विद्यापीठांनी या परिषदेला स्पॉन्सर केले आहे. सप्टेंबरमध्ये ही परिषद होत आहे.

या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिमांचे आंतरराष्ट्रीय शिक्षण केंद्र असलेल्या देवबंद मध्ये ATS कमांडो म्हणजे दहशतवाद विरोधी कमांडो पथक तयार करण्याचे केंद्र उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. यालाच माझ्या मते सामान्य भाषेत Hindu rate of counter terrorism

असे म्हणता येईल. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात इस्लामिक दहशतवादाचा धोका निर्माण होत असताना देशातली हिंदुत्ववादी सरकारे त्याचा मुकाबला करण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण केंद्र उभारत आहेत. म्हणजे एक प्रकारे ते इस्लामी दहशतवादाच्या धोक्याला प्रतिसाद तर देत आहेत परंतु तो अत्यंत धीमा slow आहे. Passive आहे.

अर्थात त्याला काही कारणे नक्की आहेत. ती genuine देखील आहेत. आधीच्या सरकारमधील हिंदुत्वाविषयीचा द्वेष, धोरणांमध्ये शैथिल्य आणि एकूणच तथाकथित शांततावादी तत्वज्ञानातील गडबड याला कारणीभूत आहेत. सध्याची हिंदुत्ववादी सरकारी निदान या तथाकथित शांततावादी तत्वज्ञानातून बाहेर येऊन काहीतरी प्रतिसाद तरी देत आहेत. पण तो धीमा आहे, हे मान्य करावे लागेल. याची कारणे आपल्याच हिंदू समाजात दडली आहेत.

कारण आपण इस्लामी आक्रमणाचा कडे विशेषत: स्वातंत्रोत्तर काळात पुरेशा गांभीर्याने पाहिलेच नाही. ज्यांनी पाहिले ते राज्यकर्ते नव्हते. त्यांना जनतेचा पाठिंबा नव्हता निदान त्यावेळी तरी नव्हता आणि जे राज्यकर्ते होते त्यांना “इस्लामी आक्रमण” हा सिद्धांतच मुळात मान्य नव्हता. त्यामुळे आत्ताची Hindu rate of counter terrorism ही टीका हिंदुत्ववादी राज्यकर्त्यांवर नसून आपल्या संपूर्ण हिंदू समाजावर आहे, हे लक्षात घेतले पाहिजे…!!

जोपर्यंत आपण समाज म्हणून आक्रमकपणे एकात्म भावाने (नुसत्या सेवाभावाने नव्हे.) जोपर्यंत पुढे येऊन खऱ्या अर्थाने इस्लामी आक्रमणाचा मुकाबला करण्याची मानसिकता जोपासत नाही तोपर्यंत आपलाHindu rate of counter terrorism  कमीच राहणार आहे. हा आपला संपूर्ण समाज म्हणून दोष आहे.

सध्याच्या हिंदुत्ववादी राज्यकर्त्यांचा याबाबतचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न निश्चित स्पृहणीय आहे. परंतु आपल्या समाज व्यवस्थेच्या आणि राज्यव्यवस्थेच्या एकूण मर्यादांमुळे सध्याच्या हिंदुत्ववादी राज्यकर्त्यांना दहशतवाद इस्लामी दहशतवादाच्या आक्रमणाला तोंड देण्यात मर्यादा पडत आहेत.

या राज्यकर्त्यांच्या क्षमतांच्या मर्यादा नाहीत. निर्णयांच्या मर्यादा नाहीत तर आपल्या संपूर्ण हिंदू समाजाच्या मानसिकतेच्या मर्यादा आहेत. यातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंतHindu rate of counter terrorism ही “आत्मटीका” आपणा सर्वांवर लागू होत राहील. हा counter terrorism rateसुधारणे तो अधिक आक्रमक पद्धतीने उंचावणे हे खऱ्या अर्थाने राज्यकर्त्यांत पेक्षा संपूर्ण हिंदू समाजाच्या हातात आहे.

आपल्या समाजातले विविध जातींचे घटक जमिनीच्या तुकड्यांसाठी आणि मालमत्तांसाठी एकमेकांशी भांडतात. पण इस्लामी आक्रमणाने नेलेला भूमि प्रदेश, जमीन, मालमत्ता पुन्हा मिळवण्यासाठी एकत्र येत नाहीत. तशी मानसिकता विकसित करत नाहीत हे यातले खरे दुर्दैव आहे…!!

यावर राज्यकर्ते म्हणून हिंदुत्ववाद्यांनी कठोर उपायांनी मात केली पाहिजे. जिथे शक्य असेल जसे शक्य असेल तिथे इस्लामिस्ट आणि कम्युनिस्ट यांच्यातली मिलीभगत तोडली पाहिजे. out of box कठोर निर्णय घेण्याची हिंदुत्ववादी सरकारांची क्षमता आहे. या निर्णयांचे प्रमाण शक्य तिथे वाढवायचे या उपायांनीच Hindu rate of counter terrorism वाढलेला दिसेल…!!

Hindu rate of counter terrorism; how to increase it??

विशेष प्रतिनिधी

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात