मोदीजी, अफगाणिस्तानातील गरीब, महिला आणि मुलांना वाचवा; सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या नातीचा टाहो


वृत्तसंस्था

कोलकत्ता : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सत्तेवर कब्जा केल्यानंतर तेथे प्रचंड अफरातफर माजली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवित आणि मालमत्ता धोक्यात आले आहेत. कोणालाच जीवनाची शाश्वती उरलेली नाही. तालिबानी बोलतात एक आणि करतात दुसरेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. मोदीजी, तुम्ही आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढे येऊन अफगाणिस्तानातल्या महिला गरीब मुले यांना वाचवावे, असा टाहो सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांची नात यास्मिन निगार खान यांनी फोडला आहे.Modiji, save the poor, women and children of Afghanistan; Tahoe, grandson of Sarhadd Gandhi Khan Abdul Ghaffar Khan

त्या जिरगा ए हिंद या पख्तून म्हणजे पठाण नागरिकांच्या संघटनेच्या अध्यक्षा आहेत. सुमारे 45 लाख पक्षातून पख्तून म्हणजे पठाण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात आश्रयाला आले आहेत. ते सर्व खान अब्दुल गफार खान ऊर्फ सरहद्द गांधी यांचे अनुयायी आहेत.



त्यांच्या जिरगा ए हिंद या संघटनेच्या यास्मिन निगार खान या अध्यक्ष आहेत. सरहद्द गांधी यांचा वैचारिक वारसा त्यांच्याकडे आला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना अफगाणिस्तानात लक्ष घालून गरीब, महिला आणि मुलांना तालिबानच्या राक्षसी राजवटीपासून वाचविण्याचे आवाहन केले आहे.

आंतरराष्ट्रीय समुदाय सीरिया, सोमालिया या देशांची चिंता करतो. तेथील नागरिकांना दहशतवाद यापासून वाचविण्याचा प्रयत्न करतो. तसेच त्यांनी अफगाण नागरिकांना तालिबानच्या कचाट्यातून सोडवावे आणि वाचवावे, असे आवाहन यास्मिन निगार खान यांनी केले आहे.

तालिबानच्या राजवटीचा अनुभव अफगाण नागरिकांना अतिशय वाईट आणि जीवघेणा आहे. महिला मुलांवर ते अमानुष अत्याचार करतात. इथून पुढच्या काळात त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. सर्व आंतरराष्ट्रीय समुदायाला तुम्ही एकत्र करू शकता. तालिबानचा पाडाव करू शकता. मोदीजी, तुम्ही पुढे या…!!, असे भावपूर्ण आवाहन यास्मिन निगार खान यांनी केले आहे.

पाकिस्तान – अफगाणिस्तान सीमेवरील पख्तुनीस्थान हे पख्तून म्हणजे पठाणांचे रहिवास स्थान आहे. त्यांनी पाकिस्तान या स्वतंत्र देशाला कधीच मान्यता दिली नाही. त्यांना भारतात सामील व्हायचे होते. सरहद्द गांधी वर्षानुवर्षे भारतात राहिले. त्यांची नात यास्मिन निगार खान दक्षिण कोलकत्यात राहतात.

त्यांनी तालिबानपासून अफगाण नागरिकांना वाचविण्याचे आवाहन ममता बॅनर्जी यांना केले नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे असे म्हटले आहे, यातच भारताचे आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित होते आहे…!!

Modiji, save the poor, women and children of Afghanistan; Tahoe, grandson of Sarhadd Gandhi Khan Abdul Ghaffar Khan

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात