शिवसेनेने सोडून दिलेले हिंदुत्व मनसेच्या दहीहंडीतून प्रकटणार…!!; शिवसेनेचे झेंडे बाजूला ठेवून शिवसैनिक होतील सहभागी!!


नाशिक : राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बरोबर सत्तेचा पाट लावून शिवसेनेने सोडून दिलेले हिंदुत्व आता मनसेच्या दहीहंडीतून प्रकटणार आहे…!!मनसेने उद्याची दहीहंडी कोणत्याही परिस्थितीत साजरी करायचीच असा निर्धार केला आहे. ठाण्यापासून मुंबईपर्यंतच्या सर्व पट्ट्यामध्ये मनसेने आक्रमकरित्या दहीहंडीचे बॅनर्स लावून आपले इरादे स्पष्ट केले आहेत.Shivsainiks may join Dahi Handi program of MNS in Mumbai and Thane

शिवसेनेने आपल्या पक्षाची दहीहंडी सत्तेवर डोळा ठेवून रद्द केली. आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी सोहळा साजरा न करण्याचे आवाहन केल्यानंतर शिवसैनिकांना दुसरे गत्यंतर उरले नाही. नेमका शिवसैनिकांच्या याच मानसिक कोंडीचा फायदा मनसेने उचलला आहे.



शिवसैनिकांना अधिकृतरित्या शिवसेना पक्षाच्या बॅनरखाली दहीहंडी साजरी करता येणार नाही, हे मनसे कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा जोरदार प्रचार मनसेचे नेते करत आहेत. शिवसेनेनेही सोडलेले हिंदुत्व आता आपणच पुढे नेहू असा संदेश मनसेचे नेते यातून देत आहेत.

अमेय खोपकर, अविनाश जाधव मंगेश देसाई हे ठाण्या-मुंबईतले नेते यात आघाडीवर आहेत. अविनाश जाधव यांनी आज आक्रमक आंदोलन करून त्याची चुणूक दाखवली आहे. केवळ शिवसेना सत्तेवर असल्याने अधिकृतरित्या शिवसैनिक दहीहंडी साजरी करू शकणार नाहीत पण मनसेच्या कार्यक्रमांमध्ये मात्र ते शिवसेनेचे झेंडे बाजूला ठेवून सहभागी होऊ शकतात. हे इथे लक्षत घेतले पाहिजे.

शिवसेना आज जरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबर सत्तेत असली तरी आपले मूळचे हिंदुत्व इतक्या सहज सोडू शकणार नाही आणि ते सोडले तर ते आयते मनसेच्या हातात पडू शकते, याची शिवसेना नेतृत्वाला नसली तरी शिवसैनिकांना पक्की जाणीव आहे.

आणि त्यामुळेच मनसेने आपले राजकीय आकर्षण वाढविण्यासाठी दहीहंडी सणाचा वापर हिंदुत्व ठसविण्याचा दृष्टीने करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांचे दडपण आले तरी किंवा मनसेच्या नेत्यांना अटक केली तरी दहीहंडी कोणत्याही प्रकारे साजरी केल्याचा मनसेला राजकीय फायदा होणार आहे. हा त्या पक्षाच्या नेत्यांचा होरा आहे आणि त्यातूनच एकीकडे शिवसेनेची कोंडी करून दुसरीकडे दहीहंडीच्या निमित्ताने आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा मनसेने त्यांचा मनसूबा आणि योजना आहे.

Shivsainiks may join Dahi Handi program of MNS in Mumbai and Thane

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात