दहीहंडी परवानगीवरून मनसेकडून शिवसेनेची मुंबई-ठाण्यात कोंडी; दक्षिण महाराष्ट्रात जयंत पाटलांकडून शिवसेनेची फोडाफोडी

प्रतिनिधी

पुणे : दहीहंडीच्या परवानगीच्या मुद्द्यावरून शिवसेनेची मुंबई-ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोंडी करत आहे. दहीहंडी कोणत्याही परिस्थितीत साजरी करणारच, असे सांगून मनसे नेते शिवसैनिकांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. Jayant Patil offered Shiv sena MLA Anil Babar to join NCP

सत्ताधारी शिवसेनेचे नेते एकीकडे आणि शिवसैनिक दुसरीकडे अशी अवस्था करून ठेवण्याचा मनसेचा मनसूबा आहे. यासाठी मनसेने हिंदुत्वाचा नारा दिला आहे. एकीकडे मनसेकडून होणारी अशी कोंडी, तर दुसरीकडे दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ठाकरे पवार सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांनी शिवसेना आमदारालाच फोडण्याची भाषा सुरू केली आहे.शिवसेनेचे खानापूर आटपाडीचे आमदार अनिल बाबर यांना टेंभू योजनेच्या एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी आपल्याकडे येण्याची म्हणजे राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर देऊन टाकली. तुम्ही आमचे होतात. तुम्ही तिकडे गेलात याचे आम्हाला दुःख आहे. तुमच्या मतदारसंघातला “करेक्ट कार्यक्रम” करण्यासाठी तुम्ही आमच्याकडे यावे, असे जाहीरपणे सांगून जयंत पाटलांनी शिवसेनेच्या विद्यमान आमदारालाच फोडण्याचा प्रयत्न चालविला आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकमेकांचे पक्ष फोडायचे नाहीत, तसा अलिखित करार आहे. त्याला नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी सुरुवातीला छेद देऊन शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए मिलिंद नार्वेकर यांनी वेळीच हस्तक्षेप करून उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिवसेनेचे नगरसेवक शिवसेनेत परत पाठवण्यास भाग पडले होते.

आता त्या पलिकडे जात राष्ट्रवादीचे आमदार नाहीत तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच शिवसेनेचे नगरसेवक नव्हे, तर शिवसेनेचे आमदार फोडायच्या मागे लागल्याचे दिसून येत आहे.

Jayant Patil offered Shiv sena MLA Anil Babar to join NCP

महत्त्वाच्या बातम्या