Delhi Oxygen Crisis : ऑक्सिजनअभावी दिल्लीत २० जणांचा मृत्यू, २०० पेक्षा जास्त रुग्णाचा जीव टांगणीला

Delhi Oxygen Crisis 20 died at Jaipur Golden Hospital due to lack of oxygen

Delhi Oxygen Crisis : दिल्लीतील अनेक रुग्णालयांत अजूनही ऑक्सिजनची तीव्र कमतरता आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे गंभीर कोरोना रुग्णांना राजधानीतील कोणत्याही रुग्णालयात जागा मिळत नाहीये. अशा परिस्थितीत लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री दिल्लीतील जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये 20 रुग्णांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा अभाव अजूनही कायम आहे. येथील 200 हून अधिक रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास आहे. यामुळे लवकरच ऑक्सिजन पोहोचला नाही, तर मोठा अनर्थ ओढवू शकतो. Delhi Oxygen Crisis 20 died at Jaipur Golden Hospital due to lack of oxygen


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील अनेक रुग्णालयांत अजूनही ऑक्सिजनची तीव्र कमतरता आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे गंभीर कोरोना रुग्णांना राजधानीतील कोणत्याही रुग्णालयात जागा मिळत नाहीये. अशा परिस्थितीत लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शुक्रवारी रात्री दिल्लीतील जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये 20 रुग्णांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा अभाव अजूनही कायम आहे. येथील 200 हून अधिक रुग्णांना श्वासोच्छवासाचा त्रास आहे. यामुळे लवकरच ऑक्सिजन पोहोचला नाही, तर मोठा अनर्थ ओढवू शकतो.

सायंकाळी पाच वाजता ऑक्सिजन पुरवठा होणार होता, परंतु रात्री 12 वाजेपर्यंतही झाला नाही. जे ऑक्सिजन मिळाले तेही निम्मेच. हॉस्पिटलमध्ये आता अर्ध्या तासाचा ऑक्सिजन शिल्लक आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणाले की, मृत्यू झालेले सर्व 20 रुग्ण ऑक्सिजनवर होते, ऑक्सिजनच्या अभावामुळे आम्हाला प्रवाह कमी करावा लागला. आम्ही असे म्हणत नाही की, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला, परंतु हेदेखील एक मोठे कारण असू शकते.

शनिवारी बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या संकटाची हीच परिस्थिती पाहायला मिळाली, साठा संपल्यामुळे रुग्णांचे श्वास थांबणार होते, परंतु ऑक्सिजन संपण्याच्या अगदी आधी रुग्णालय प्रशासनाच्या एसओएस कॉलनंतर येथे 500 लिटर ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. बत्रा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. गुप्ता म्हणाले की, दिल्ली सरकारने आम्हाला ऑक्सिजन टँकर पुरवला आहे. आमच्या सर्व रुग्णांसाठी आपल्याकडे एक ते दीड तासाचा ऑक्सिजन आहे. आम्हाला दिवसाला 8,000 लिटर ऑक्सिजनची आवश्यकता आहे. आम्हाला 12 तास हात जोडल्यानंतर 500 लिटर ऑक्सिजन मिळाला. आता पुढचे 500 लिटर केव्हा मिळेल, हे माहिती नाही. रुग्णालयात 350 रुग्ण असून 48 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत.

त्याचवेळी दिल्लीतील सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रभारींनी शनिवारी सांगितले की, आम्ही ऑक्सिजनच्या अभावामुळे नवीन रुग्णांची भरती थांबवली आहोत. आम्ही आमच्या रुग्णालयातून रुग्णांना सुटीही करत आहोत.

काल ऑक्सिजनअभावी 25 रुग्णांचा मृत्यू

गुरुवारी रात्री दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात गंभीर आजारी असलेल्या 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आणखी बरेच रुग्ण संकटात आहेत. कमी दाबाने ऑक्सिजनचा पुरवठा, हे यामागचे मोठे कारण असू शकते, अशी चर्चा सुरू आहे. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास रुग्णालयाने मृतांची माहिती दिली.

गंगाराम रुग्णालयाचे चेअरमन डॉ. राणा म्हणाले की, ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झाला असे म्हणणे चुकीचे आहे. कारण आयसीयूमध्ये दाब कमी झाला तेव्हा आम्ही इतर पद्धतींनी रुग्णांना ऑक्सिजन दिला.

Delhi Oxygen Crisis 20 died at Jaipur Golden Hospital due to lack of oxygen

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात