नाशिकमध्ये रा.स्व. संघाचे कोविड सेंटर रविवारपासून सेवेत; लसीकरण आणि अन्य वैद्यकीय उपक्रमांवरही भर


प्रतिनिधी

नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नाशिक महापालिका ह्यांच्या संयुक्त सहकार्याने हॉटेल राॅयल हेरीटेज, खडकाळी सिग्नल जवळ, गंजमाळ येथे ५० बेड्सचे ‘कोविड केअर सेंटर’ (विलगीकरण कक्ष) सुरू होत आहे. हे ‘कोविड सेंटर’ हे रविवार, दि.२५ एप्रिल रोजी वर्धमान जयंतीच्या मूहूर्तावर सूरू करणार आहे. The team’s Covid Center is in service from Sunday; Emphasis on vaccinations and other medical activities in nashik

ह्या कोविड सेंटरवर जे कोविड पॉझिटिव्ह आणि लक्षणे नसलेल्या रुग्णासाठी की ज्यांना होम आयसोलेशनमध्ये रहाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे अशांना दाखल करुन घेतले जाईल. रुग्णास दाखल करुन घ्यायचा निर्णय योग्य तपासणीनंतर सर्वस्वी ‘कोविड सेंटर’ वरील डॉक्टरांच्या सल्ल्याने होईल.

‘कोविड सेंटर’ वर साधारण आठ ते दहा दिवसाच्या अवधीसाठी रुग्णाला दाखल करुन घेतले जाईल.

रुग्ण कोव्हिड सेंटरवर असतांना त्याच्यासाठी आहार, वैद्यकीय काढे, जरुरीप्रमाणे व्यायाम तसेच त्यांची मनस्थिती सकारात्मक रहावी ह्यासाठीचे कार्यक्रम ह्याचे दिवसभराचे नियोजन ‘कोविड सेंटर’ डॉक्टर्स आणि प्रशासनाने केले आहे. वरील सेवा ही निःशुल्क असेल!

नागरिकांनी कोविड केअर सेंटर’ (विलगीकरण कक्ष) सुविधेचा लाभ घेण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा:

8446599311 आणि 8446599211

वरील उपक्रमाबरोबरच सध्याच्या परिस्थितीतील रक्त तुटवडा लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती तर्फे नाशिकरोड भागात १८ एप्रिल २०२१ ला कोव्हिडचे प्रोटोकाल पाळून ‘रक्तदान शिबीर’ आयोजित केले होते, ह्यात ३८ स्वयंसेवकांनी रक्तदान केले.

तसेच आज ऑक्सिजन सिलींडर्स, ऑक्सिजन काँन्सन्ट्रेटर्स आणि प्लाझ्मा डोनेशन हे सिव्हिअर करोनाबाधित रुग्णासाठी काही प्रमाणात जीवनदायी ठरू लागले आहे.अशा परिस्थितीत जनकल्याण संकूल ऊत्तमनर येथील रुग्णोपयोगी साहित्यकेंद्रात रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून आपण १५ ‘आॕक्सिजन काँन्स्न्ट्रेटर्स’ विकत घेतले आहेत व ते आपण करोनाबाधीत गरजूंना डिपॉझिट ठेवून घेऊन विनामूल्य घरी वापरायला देणे सूरु केले आहेत. नजिकच्या काळात आजून ५० ऑक्सिजन काँन्सन्ट्रेटर जनकल्याण संकूलमधे ऊपलब्ध करण्याचे नियोजन आहे.

करोनाबाधित वरील गरज आसलेल्यांनी अंकुशजी बडशीले +919890060762 ह्यांच्याशी संपर्क करावा.

शौनक गायधनी आणि अभिषेक पिंगळे ह्या स्वयंसेवकांनी समविचारी स्वयंसेवकांची टीम जनकल्याण समिती – नाशिक’ ह्या WA गृपखाली संघटित केली. ह्या टीमच्या प्रयत्नातून दूसर्या करोना लाटेत आतापर्यंत जवळ जवळ ६०-६५ करोना बाधितांना ‘प्लाझ्मा डोनर’ ऊपलब्ध करुन देण्यात आले.

तसेच ह्याच टीमतर्फे समाजातील जास्तीत जास्त करोनातून बरे झालेल्या रुग्णांनी पूढे येऊन प्लाझ्मा डोनेशन करावे ह्यासाठी ठिकठिकाणी आवाहन करण्यात येत आहे. बर्या झालेल्या रुग्णांशी संवाद सधून त्यांना प्लाझ्मा दानासाठी त्यासंबंधी माहिती देऊन ऊद्यूक्त केले जात आहे.

तसेच जवळ जवळ ४० जणांना घरी आॕक्सिजन काँन्सन्ट्रेटर अथवा जंबो सिलींडरची सोय करुन दिली आहे.

ह्या व्यतिरिक्त भारत सरकारने पूरस्कृत केलेल्या लसीकरणाची मोहिम सक्षम व्हावी म्हणून रा. स्व. संघ नाशिक शहर महविद्यालयीन प्रमूख विक्रमजी थोरात ह्यांनी शहरातून साधारण ३०० जणांची टीम तयार केली.

ह्यात प्रत्येक स्वयंसेवकाने फक्त एकच दिवस दूपारी १ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करायचे आहे. कामाचे स्वरुप लसीकरणासाठी आलेल्या लोकांची नोंदणी करणे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे. आणि लसीकरण झाल्यावर अर्धातास त्यांना निरीक्षण कक्षात विलग ठेऊन त्यांच्याशी संवाद साधणे.

दररोज असे किमान ५ ते जास्तीत जास्त १० स्वयंसेवक ह्या ऊपक्रमा अंतर्गत श्रीगुरूजी रुग्णालयातील लसीकरण व्यवस्थापनात सहभागी होत आहेत.

ह्याच बरोबर पहिल्या लाटेप्रमाणे लोकांना टिफीन, घरपोच औषधे देणार्या स्वयंसेवकांबद्दल आणि संस्थांबद्दल माहिती देणे. वेगवेगळ्या भागात अँब्यूलन्सची माहिती देणे आसे स्थनिक पातळीवरचे प्रयत्न चालूच आहेत.

The team’s Covid Center is in service from Sunday; Emphasis on vaccinations and other medical activities in nashik

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था