Inspiring : कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी गुरुद्वाराचा पुढाकार, ‘ऑक्सिजन लंगर’मुळे वाचताहेत हजारोंचे प्राण

Inspiring Work By Gurudwara in Indirapuram Ghaziabad, Started Oxygen Langar to help COVID19 patients

Oxygen Langar : कोरोना महामारीने अवघा देश त्रस्त असला तरी या संकटाच्या काळात अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये एका गुरुद्वाराने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. गुरुद्वाऱ्याने ऑक्सिजन लंगरची सेवा सुरू केली आहे. गाझियाबादच्या इंदिरापुरम गुरुद्वारामध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन ऑक्सिजन लंगरची सेवा सुरू केली आहे. Inspiring Work By Gurudwara in Indirapuram Ghaziabad, Started Oxygen Langar to help COVID19 patients


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना महामारीने अवघा देश त्रस्त असला तरी या संकटाच्या काळात अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये एका गुरुद्वाराने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. गुरुद्वाऱ्याने ऑक्सिजन लंगरची सेवा सुरू केली आहे. गाझियाबादच्या इंदिरापुरम गुरुद्वारामध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन ऑक्सिजन लंगरची सेवा सुरू केली आहे.

गुरुद्वारामध्ये ऑक्सिजनची सुविधा

या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, ज्या लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्यांनी इंदिरापुरम परिसरातील गुरुद्वारामध्ये यावे. येथेच त्यांना ऑक्सिजन लावला जाईल. ज्या लोकांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांचे नातेवाइक स्वत: रुग्णांना तेथे वाहनातून आणत आहेत. संस्थेची टीम ऑकसिजन सिलिंडर्सच्या रिफिलिंगची व्यवस्था करत आहे. गुरुद्वाराचे व्यवस्थापक गुरप्रीतसिंग रम्मी म्हणाले की, “आम्ही रस्त्यावरही गाडीत मोबाइल ऑक्सिजनची सुविधा पुरवत आहोत.”

प्रशासनाने करावी मदत

गुरुद्वाराच्या संस्थेनेही गाझियाबाद प्रशासनाला मदतीचे आवाहन केले आहे. गुरप्रीतसिंग म्हणाले की, आम्ही गाझियाबादचे जिल्हाधिकारी व्ही.के. सिंह जी यांना बॅकअपसाठी २० ते २५ ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. 25 सिलिंडरच्या माध्यमातून एक हजार लोकांचे प्राण वाचू शकतात. कोरोनामुळे संक्रमित लोकांना ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. ऑक्सिजनअभावी बर्‍याच जणांना आपला जीव गमावावा लागला आहे. दरम्यान, गुरुद्वाराच्या या उपक्रमाचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.

Inspiring Work By Gurudwara in Indirapuram Ghaziabad, Started Oxygen Langar to help COVID19 patients

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात