कोरोनाचा हाहाकार : देशात एकाच दिवसात रेकॉर्ड ब्रेक ३.४६ लाख रुग्णांची नोंद, २६२४ जणांचा मृत्यू

Todays Corona Updates In India, more than 3.49 lakh patients registered in 24 hours, 2767 deaths

Corona outbreak : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार केला आहे. पुन्हा एकदा मागचे सर्व रेकॉर्ड मोडत दिवसभरात सर्वात जास्त रुग्णसंख्या आढळली आहे. वर्ल्डमीटरच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांत 3,46,786 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी, या काळात 2624 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. मागच्या सलग आठ दिवसांपासून रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. Corona outbreak Latest Updates In India Record break of 3.45 lakh patients in Just 24 hours


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार केला आहे. पुन्हा एकदा मागचे सर्व रेकॉर्ड मोडत दिवसभरात सर्वात जास्त रुग्णसंख्या आढळली आहे. वर्ल्डमीटरच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांत 3,46,786 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी, या काळात 2624 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. मागच्या सलग आठ दिवसांपासून रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे.

देशातील महामारीमुळे मरणाऱ्यांची एकूण संख्या वाढून 1,89,544 झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे संसर्गित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 1,66,10,481 वर गेली आहे. देशात उपचार घेत असलेल्या म्हणजेच सक्रिय रुग्णांची संख्या 25,52,940 वर आहे. हा आकडा संक्रमित रुग्णांच्या एकूण संख्येच्या 15.3 टक्के आहे. यापूर्वी गुरुवारी रात्री नवीन 3.32 लाख रुग्ण आढळले. याच काळात 2624 जणांचा मृत्यू झालाय. अशाप्रकारे भारताने कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत विश्वविक्रम मोडला आहे. दैनंदिन केसेसच्या बाबतीत भारताने अमेरिकेलाही मागे टाकले आहे, ही देशासाठी चिंतेची बाब आहे.

देशातील कोरोनाची सद्य:स्थिती

  • 24 तासांत आढळलेले रुग्ण : 3,46,786
  • 24 तासांत झालेले मृत्यू : 2624
  • 24 तासांत बरे झालेले रुग्ण : 2,19,838
  • देशातील सक्रिय रुग्णसंख्या : 25,52,940
  • आतापर्यंत देशातील एकूण रुग्णसंख्या : 1,66,10,481
  • आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 1,89,544
  • आतापर्यंत बरे झालेले एकूण बरे झालेले : 1,38,67,997

 

बरे होण्याचा दर 83.5 टक्क्यांवर

कोरोना संक्रमित रुग्णांचा बरे होण्याचा दर 83.5 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आकडेवारीनुसार, या आजाराने बरे होणार्‍या लोकांची संख्या वाढून 1,38,67,997 झाली आहे. कोरोनामधील राष्ट्रीय मृतांची संख्या घटून 1.1 टक्के झाली आहे.

आठ राज्यांमध्ये 77 टक्के मृत्यू

24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक 773 जणांचा मृत्यू झाला. यानंतर दिल्लीत 348, छत्तीसगडमध्ये 219, उत्तर प्रदेशात 196, गुजरात 142, कर्नाटकात 190, पंजाबमध्ये 75 आणि मध्य प्रदेशात 74 जणांचा मृत्यू झाला. या आठ राज्यांमध्ये एकूण 2017 मृत्यू झाले आहेत, जे एकूण 2620 मृत्यूंपैकी 76.98 टक्के आहेत.

60 टक्के रुग्ण 7 राज्यांतील

महाराष्ट्रात सर्वाधिक 66,836 नवीन रुग्ण आढळले. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 2844747, दिल्लीमध्ये 24331, कर्नाटकमध्ये 26962, केरळमध्ये 28447, राजस्थानमध्ये 15398 आणि छत्तीसगडमध्ये 17397 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. या सात राज्यांमध्ये एकूण संक्रमणांपैकी 60.24 टक्के वाटा आहे.

Corona outbreak Latest Updates In India Record break of 3.45 lakh patients in Just 24 hours

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात