आमने-सामने : राजेश टोपेंच्या ‘त्या’ असंवेदशील विधानावर प्रविण दरेकर यांचा संताप -जनतेच्या दुःखावर मीठ चोळणारी वक्तव्य तरी करू नका !


विशेष प्रतिनिधी

मुंबई: एकीकडे विरामधील हॉस्पिटलच्या आगीत 15 निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले . यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अत्यंत बेजबाबदार असं वक्तव्य केलं ‘विरार आगीची घटना ही काही नॅशनल न्यूज नाही.’ अशी असंवेदनशील प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली . या वक्तव्याचा समाचार घेताना, आणखी किती बळी गेल्यावर नॅशनल न्यूज होईल, असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे. तर समाज माध्यमातून यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. Face to face: Praveen Darekar’s anger over Rajesh Tope’s ‘that’ insensitive statement – don’t even make a statement rubbing salt on the grief of the people!दरेकर यांनी याबाबत टोपे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. राजेश टोपे यांचे विधान बेजबाबदारपणाचेच नाही तर संतापजनक आहे, असे दरेकर म्हणाले. यांना जनतेचे आणखी किती बळी हवेत म्हणजे नॅशनल न्यूज होईल, असा संतप्त सवालही दरेकर यांनी विचारला. राज्यातील आघाडी सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या संवेदना मेल्या असून ते बेताल बडबड करत आहेत.

राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याऐवजी, जनतेच्या दुःखावर मीठ चोळणारी वक्तव्य हे मंत्री करीत आहेत.

आरोग्य व्यवस्थेवरील ताण मी समजू शकतो. पण पुन्हा पुन्हा होणाऱ्या चुकांमुळे निष्पाप लोकांचा जीव जात आहे. सरकारमधील लोक मुरदाडासारखे गप्प बसणार असतील तर या लोकांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. जर भंडारा, भांडूप या घटनांमधून सरकार बोध घेणार नसेल तर आपण सरकारमध्ये कशासाठी आहोत हा प्रश्न पडायला हवा. फक्त मिडियासमोर येऊन बोलण्यापेक्षा यंत्रणेतील चुका दुरूस्त केल्या असत्या तर निष्पाप लोकांचे बळी गेले नसते.

फक्त माध्यमांसमोर जावून वारंवार बोलण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यामधील पालकमंत्र्याने आपआपल्या जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये यंत्रणा तपासली असती तर शेकडो लोकांचे निष्पाप जीव गेले नसते. भंडारा, भांडूप आणि नाशिकमध्ये लोक लागोपाठ या घटनांमध्ये नाहक यंत्रणेच्या चुकांचा बळी पडत आहेत. मंत्र्यांनी मिडियासमोर बोलण्यापेक्षा आपआपल्या जिल्ह्यात ऑडिटचे काम केले असते तर लोक वाचले असते. सरकारने वेळीच या गोष्टी मॉनिटर करायला हव्यात असेही दरेकर म्हणाले. भंडाऱ्याच्या घटनेनंतर फायर ऑडिट करू असे आश्वासन देण्यात आले होते. पण त्यानंतरही वारंवार घडलेल्या घटनांमध्ये आपण बोध घेतलेला नाही. राज्यात किती फायर ऑडिट झाले ? याची माहिती सरकारने द्यावी.

Face to face : Praveen Darekar’s anger over Rajesh Tope’s ‘that’ insensitive statement – don’t even make a statement rubbing salt on the grief of the people!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था